IMPIMP

Parambir Singh | परमबीर सिंह यांना मोठा दिलासा; पण, सुनावला दंड

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | Anti Corruption interrogates Parambir Singh for 2 hours in Police Inspector Anup Dange reported the case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Parambir Singh | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप करणारे मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) हे तेव्हापासून गायब होते. काही दिवसांपुर्वी ते मुंबईत दाखल झाले आहेत. अनेक दिवसांनी परमबीर हे आज (सोमवारी) चौकशीसाठी चांदिवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) हजर झालेत. परमबीर यांना गैरहजर राहिल्याबद्दल 15 हजारांचा दंड ठोठावला. मात्र, एक मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या विरोधातील जामीनपात्र अटक वॉरंट (Arrest warrant) रद्द करण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

परमबीर यांना 15 हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. ही रक्कम आठवडाभरात मुख्यमंत्री सहायता निधीत (CM Assistance Fund) जमा करण्याची हमी देखील त्यांना दिली आहे.
दरम्यान, सध्या आयोगासमोर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांची चौकशी सुरू आहे.
तर, परमबीर सिंह (Parambir Singh) हे चौकशीसाठी हजर राहणार का? अशी विचारणा यावेळी न्यायमूर्ती के. यू. चांदिवाल (Justice K. U. Chandiwal) यांनी केली.
त्यावेळी त्यांच्याविरोधात अनेक प्रकरणे सध्या सुरू असल्याने तूर्तास चौकशीला गैरहजर राहण्याची मुभा देण्यात यावी, अशी विनंती परमबीर सिंह यांच्या वकिलांनी केली आहे.

दरम्यान, परमबीर सिंह यांच्या वकीलांनी केलेल्या विनंती नंतर त्यावर याबाबत प्रतिज्ञापत्रावर तपशीलवार माहिती आयोगासमोर देण्यात यावी.
त्यानंतर गैरहजर राहण्याबाबतची मुभा देण्याच्या अर्जावर आदेश देऊ, असं संकेत न्या. चांदिवाल (Justice K. U. Chandiwal) यांनी दिले आहेत.
दरम्यान, परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी आयोगासमोर स्पष्टीकरण दिले आहे की, ‘आजारपणामुळे यापूर्वी झालेल्या सुनावणीला आयोगासमोर हजर राहता आले नाही.
तसेच जामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती अर्जाच्या माध्यमातून केली होती.
त्यानंतर न्या. चांदिवाल यांनी वॉरंट रद्द करणारा आदेश काढला, परंतु, परमबीर यांना 15 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.

Web Title : Parambir Singh | former mumbai police commissioner param bir singh relief from chandiwal commission but imposed fine of rs 15000 marathi news

हे देखील वाचा :

LIC New Jeevan Anand | ‘एलआयसी’ची ‘ही’ पॉलिसी खुप कामाची ! विना प्रीमियम मिळते 10 लाखाचे कव्हर आणि दरवर्षी बोनस

Crude Oil Prices | कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रभाव, LPG सिलेंडरपासून पेट्रोल-डिझेलपर्यंत होऊ शकते स्वस्त

Pune Crime | कंपनीतून बेकायदेशीरपणे पैसे काढून देण्यास विरोध; कंपनी मालकाची बहिण, आई वडिलांनी केली महिलेची सोशल मिडियात बदनामी

Related Posts