IMPIMP

Parambir Singh | परमबीर सिंग आणखी ‘गोत्यात’ ! अटकेतील महिला PI आशा कोरके आणि PI गोपालेचा धक्कादायक खुलासा

by nagesh
Parambir Singh | former mumbai police commissioner parambir singh has refused to accept his suspension order maharashtra government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांचा पाय आता आणखी खोलात गेला आहे. खंडणी प्रकरणात (Ransom case) अटक करण्यात आलेल्या दोन पोलीस निरीक्षकांना (Police Inspector) न्यायालयात हजर करण्यात आले असता गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 लाख रुपये परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या सांगण्यावरुन घेतल्याचे समोर आले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

परमबीर सिंग (Parambir Singh) खंडणी प्रकरणात राज्य सरकारने SIT स्थापन केली होती.
या समितीने केलेल्या चौकशी दरम्यान पुरावे आढळून आले होते.
त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) दोन पोलीस निरीक्षकांना अटक केली आहे.
नंदकुमार गोपाले (Nandkumar Gopale) आणि आशा कोरके (Asha Korke) अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहे.

गोपाले आणि कोरके या दोघांना आज किला कोर्टात (killa court) हजर करण्यात आले.
सरकारी पक्षाने दोघांची 7 दिवसांची पोलीस कोठडीची (police custody) मागणी केली आहे.
या दोघांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 लाख रुपये घेतले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली आहे की, या दोघांनी तक्रारदाराकडून पैसे घेण्याकरता हवालाचा वापर केला.
परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन पैशांचा व्यवहार झाला होता. हवाला ऑपरेटर मोमिन (Hawala operator Momin) यांच्या माध्यमातून हा व्यवहार झाला.
10 रुपयांची नोट 50 लाख रुपयांच्या हवाला व्यवहाराचा कोड होता.
पोलीस निरीक्षक आशा कोरके यांनी हवाला मार्फत पैसे घेतले होते.
पैशाची देवाणघेवाण होताना चॅटिंगद्वारे कन्फर्मेशन दिले होते.
सरकारी वकिलांनी परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या विरोधात अजामिन पात्र वॉरंटची मागणी केली आहे.

Web Title : Parambir Singh | Mumbai former CP parambir singh recovered rs 50 lakh orders were given to 2 police officers

हे देखील वाचा :

Nawab Malik | ‘आता CM आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का?’ BJP चा सवाल

Pune Crime | राज्य उत्पादन शुल्क विभागाची पिंपरी चिंचवडमध्ये मोठी कारवाई ! बनावट स्कॉच व व्हिस्की जप्त; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Benefits of Mor Pankh | ‘मोरपंख’ प्रत्येक संकटावर रामबाण उपाय, जाणून घ्या याच्याशी संबंधीत 7 उपाय आणि सविस्तर माहिती

Related Posts