IMPIMP

Parambir Singh | काय सांगता ! होय, परमबीर सिंग फरार, जुहूमधील फ्लॅटच्या दरवाज्यावर न्यायालयाची ऑर्डर

by nagesh
Parambir Singh | mumbai kila court order about param bir singh as absconding pasted outside his flat marathi news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Parambir Singh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींचे बाॅम्ब टाकणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांना काही दिवसांपुर्वी फरार घोषित केलं आहे. मुंबईच्या किला कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान सिंग यांना फरार घोषित करण्यात आलं होतं. तर आता फरार (Absconding) असलेली नोटीस परमबीर यांच्या जुहू (Juhu) येथील फ्लॅटच्या दरवाज्यावर लावण्यात आलीय. संबंधित कारवाई ही कोर्टाच्या आदेशान्वये करण्यात आली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

तर, न्यायालयाने परमबीर (Parambir Singh) यांना फरार घोषित केले असले तरी, सर्वाेच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल असलेल्या
याचिकेत परमबीर यांच्या वकिलांनी ते फरार नसून भारतातच असल्याचा दावा केलाय. तर, ते लवकरच मुंबईत परतणार असल्याची माहिती
न्यायालयाला दिली होती. परंतु, त्यांनी मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नसल्याचं सांगत केंद्रीय यंत्रणांनी चौकशी करावी, अशी विनंती परमबीर यांच्या
वकिलांनी सर्वाेच्च न्यायालयात (Supreme Court) केलीय. या प्रकरणी परमबीर सिंग यांना अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, फरार घोषित केल्यानंतर आपली संपत्ती जप्त होईल, अशी भीती परमबीर (Parambir Singh) यांना वाटली. त्यानंतर त्यांनी सर्वाेच्च न्यायालयात अटपूर्व जामीनासाठी धाव घेतली. त्यांच्या जामिनावर आता 6 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. एककीडे सर्वाेच्च न्यायालयात (Supreme Court) या प्रकरणी खटला सुरु असताना दुसरीकडे मुंबई पोलिसांची (Mumbai Police) कारवाई सुरु आहे. परमबीर यांच्या घराबाहेर लावलेल्या नोटीसमध्ये 30 दिवसांत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण ते तरीही हजर राहिले नाहीत तर त्यांची संपत्ती जप्त होऊ शकते.

Web Title :- Parambir Singh | mumbai kila court order about param bir singh as absconding pasted outside his flat marathi news

हे देखील वाचा :

Cryptocurrency | Shih Tzu ने गुंतवणुकदारांना केले मालामाल! केवळ 2 तासात 1000 रुपये झाले रू. 60 लाख

Palghar Crime | धक्कादायक ! आश्रमशाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या

Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना सिंहगड पोलिसांकडून अटक; 2 पिस्टल 3 काडतुसे जप्त

Related Posts