IMPIMP

Parambir Singh | परमबीर सिंह प्रकरणात सरकारी वकिलांची तपास अधिकाऱ्यांविरोधात CM, DGP यांच्याकडे तक्रार

by nagesh
Parambir Singh | can suspension of former mumbai police commissioner parambir singh may be revoked

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या (Ransom case) एका गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत ( Special Public Prosecutor Pradeep Gharat) यांनी राज्याचे मुख्यमंत्री (CM), पोलीस महासंचालक (DGP) आणि ठाणे पोलिसांकडे (Thane Police) तक्रार केली आहे. परमबीर सिंह (Parambir Singh) यांचे हे प्रकरण तपास अधिकारी (Investigating officer) बेजबाबदारपणे हाताळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाच्या तपासासंदर्भात कोणतीही माहिती (Information) दिली जात नाही याचा फायदा थेट आरोपींना होत असल्याचे सरकारी वकील घरत यांनी म्हटले आहे. तसेच तपास अधिकाऱ्यांच्या अशा वागणुकीचे नक्की कारण काय आहे, याचा देखील तपास व्हायला पाहिजे असे घरत म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

ठाण्यातील ठाणे नगर पोलीस ठाण्यात (Thane Nagar Police Station) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या तक्रारीनंतर परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त एन.टी. कदम (ACP N.T. Kadam), पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे
(Police Inspector Rajkumar Kothmire), माजी एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप सिंह (Encounter Specialist Pradeep Singh) आणि गँगस्टर रवी पुजारी
(Gangster Ravi Pujari) यांच्यासह 28 जणांवर खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रदीप घरत यांना एका वृत्तवाहिनीला सांगितले, या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून 30 सप्टेंबर रोजी त्यांची नियुक्ती झाली.
नियुक्ती झाल्याची माहिती सरकारच्या वतीने तपास अधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येते.
या प्रकरणाचा तपास बाबासाहेब निकम (Babasaheb Nikam) हे करीत असून त्यांनाही माहिती असल्याचे घरत यांनी सांगितले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

तपास अधिकारी बाबासाहेब निकम यांच्याकडून तपासाशी निगडीत कोणतीही माहिती दिली जात नाही.
असा आरोप प्रदीप घरत यांनी केला आहेत. तपास अधिकाऱ्याकडून कोणतीच माहिती मिळत नसल्याने या प्रकरणाबाबत काहीच ठोस माहिती नसल्याचे घरत यांनी सांगितले
. तपास अधिकारी निकम यांचे अशा प्रकारची वर्तवणूक ही त्यांच्या तपासाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित करतात.
आरोपींनाही याचा फायदा मिळत आहे. कोर्टात या प्रकरणी बाजू मांडताना अडचणी येऊ शकतात, असेही प्रदीप घरत यांनी सांगितले.

Web Title : Parambir Singh | public prosecutor Pradeep Gharat filed complaint to cm and DGP as well as Thane Police against investigating officer of parambir singh thane extortion case

हे देखील वाचा :

LPG Connection | केवळ एका मिस्ड कॉलवरून मिळेज LPG कनेक्शन, ‘हा’ नंबर करा मोबाईलमध्ये सेव्ह

Numerology | अंक ज्योतिषनुसार ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर लक्ष्मी मातेची असते कृपा, कधीही भासत नाही पैशाची कमतरता

Gold Silver Price Today | सोन्याचे दर वधारले तर, चांदीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Related Posts