IMPIMP

Parbhani Crime | झोपेतच मृत्यूने गाठलं ! घरावर उसाची ट्रॉली पडून महिलेचा मृत्यू, 8 वर्षाची नात गंभीर जखमी

by nagesh
Pune Crime | baramati youth knife attack on girl in her office Baramati City Police Station on the spot

परभणी : सरकारसत्ता ऑनलाइन परभणी जिल्ह्यातील (Parbhani Crime) पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे शेतातील ऊस कारखान्याला घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरची ट्रॉली शेडवर (tractor trolley overturns house) पडली. यामध्ये शेडमध्ये झोपलेल्या महिलेचा मृत्यू झाला तर नात गंभीर जखमी झाली आहे. ही घटना (Parbhani Crime) आज (मंगळवार) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. उसाच्या ढिगाऱ्याखाली दबून 52 वर्षीय महिलेचा झोपेतच मृत्यू झाला. तर एक 8 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

घरात पलंगावर झोपलेल्या पार्वती रंगनाथ पवार Parvati Ranganath Pawar (वय-52) यांचा मृत्यू झाला आहे. तर शिवानी संजय जाधव Shivani Sanjay Jadhav (वय-8) ही गंभीर जखमी झाली आहे. या दोघी उसाच्या ढिगाऱ्याखाली गाढल्या गेल्या. अचानक अंगावर कोसळलेल्या ऊसाच्या मोळ्यांमुळे पहाटेच्या गाढ झोपेत असलेल्या आजी-नातीला काहीच हालचाल करता आली नाही. (Parbhani Crime)

अपघाताची माहिती मिळताच, ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिलेच्या आणि मुलीच्या अंगावर पडलेल्या ऊसाच्या मोळ्या बाजूला करुन दोघींना बाहेर काढले. दोघांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. जखमी मुलीवर गावात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी परभणी येथे हालवण्यात आले आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Parbhani Crime | Death in sleep ! Woman dies after sugarcane trolley falls on house, 8-year-old granddaughter seriously injured

हे देखील वाचा :

Rekha Jare Murder Case | रेखा जरे हत्याकांडाला वर्ष झाले तरी न्यायालयात सुनावणी नाही

83 Trailer Out | स्वातंत्र्यानंतर परदेशाच्या भूमीवर ‘अशी’ कमवली ‘इज्जत’, रणवीर सिंगच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चहाते म्हणाले – ‘सुपर हिट’ (व्हिडिओ)

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा घणाघात; म्हणाले – ‘शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलाच पक्ष संपवला’

Related Posts