IMPIMP

Parenting | मुलांच्या ‘या’ 7 गोष्टी चुकीच्या मार्गाला जाण्याचे संकेत, दिसताच व्हा सावध; जाणून घ्या

by nagesh
Parenting | parenting warning signs your child is headed for trouble wrong path

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Parenting | पालकांना सतत या गोष्टीची चिंता सतावत असते की, त्यांचे मुल काय करत आहे. मुल चुकीच्या मार्गाला जाऊ नये यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न ते करतात. वाढत्या वयात मुले चूक-बरोबर यामधील फरक समजू शकत नाहीत आणि कधी-कधी ते असे काही करतात जे सर्वांसाठी (Parenting) संकट बनते.

मुलांचे काही वर्तन पाहून तुम्ही ओळखू शकता की, तुमचे मुल कोणत्या मानसिक स्थितीतून जात आहे. तज्ज्ञांनुसार, मुलांमध्ये ही 7 लक्षणे दिसल्यास पालकांनी सावध व्हावे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

1. मूड स्विंग (Mood swings) –
मूड स्विंग होणे सामान्य गोष्ट आहे परंतु मुलांमध्ये हार्मोनमुळे हा बदल दिसतो. मुल अचानक उदास किंवा खुप जास्त उत्साही दिसत असेल तर त्याकडे लक्ष द्या. कोणत्याही कारणाशिवाय मुल डिप्रेशनमध्ये जात असेल तर ही चिंतेची बाब आहे. अशावेळी धैर्याने काम घ्या. मुलासोबत प्रेमाने बोलून त्याच्या वर्तनात होत असलेल्या बदलांचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा.

2. रूची न घेणे (Not interested) –
मुल कोणत्याही कामात रस घेत नसेल किंवा कोणतेही काम मधूनच सोडत असेल तर ही चिंतेची बाब आहे. त्याच्यात डिप्रेशन किंवा आत्मविश्वासाची कमतरता तर नाही ना याकडे लक्ष द्या. (Parenting)

3. गोष्टी लपवणे (hide things) –
मुलांमध्ये गोष्टी पालकांपासून लपवण्याची सवय पुढे धोकादायक होऊ शकते. याचा अर्थ हा आहे की मुलाला ती सवय आवडत आहे किंवा त्याला तुमच्यावर विश्वास नाही. हे दोन्ही चिंता वाढवणारे आहे.

4. अभ्यासात वेगाने मागे पडणे (Rapid retreat in study) –
जर एखादे मुल अभ्यासात वेगाने मागे पडत असेल आणि सामान्यापेक्षा सुद्धा कमी गुण मिळत असतील तर याचा अर्थ आहे की, काहीतरी गडबड आहे. याच्या पाठीमागे शिकण्याची अक्षमता, आळस, जास्त लक्ष न देणे किंवा काही घरगुती कारणे असू शकतात. हे डिप्रेशन किंवा असंतोषांचे सुद्धा संकेत असू शकतात. अशावेळी मुलावर ओरडणे किंवा हात उचलण्याऐवजी प्रकरणाच्या मुळापर्यंत जा. (Parenting)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

5. मित्र अचानक बदलणे (Sudden change of friends) –
नवे मित्र बनवणे चांगले आहे, मात्र अचानक मुल आपला ग्रुप सोडून एकदम नवीन लोकांसोबत फिरणे किंवा त्यांना पसंत करणे हा चिंतेचा विषय आहे. मुल चुकीच्या संगतीत पडलेले नाही ना हे तपासा.

6. पर्सनालिटीत बदल (Changes in personality) –
तरूणावस्थेत पर्सनालिटीमध्ये बदल होणे सामान्य आहे परंतु याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
खुप जास्त चंचल मुल एकदम शांत होणे किंवा निराश वाटणे याचा अर्थ आहे की, ते एखाद्या अडचणीतून जात आहे.
कदाचित मुल इच्छेविरूद्ध एखादे काम करत असेल किंवा शाळेत काही मुले त्रास देत असावीत. अशावेळी मुलाशी शांतपणे बोला.

7. कपड्यांमध्ये बदल (Changes in clothing) –
नवनवीन लूकसह एक्सप्रिमेंट करणे चांगली गोष्ट आहे.
परंतु तरूण मुलांमध्ये कपडे निवडण्याच्या पद्धतीत बदल होणे एक असुरक्षित भावना सुद्धा असू शकते.
जसे की अचानक जास्त ढिले-ढिले कपडे घालण्यास सुरूवात करणे जसे की ते काही लपवण्याचा प्रयत्न करत आहे.
किंवा एखादी निशाणी लपवण्यासाठी फुल हाताचा शर्ट घालणे.
या सर्व गोष्टी सांगतात की मुलाला आपल्या लूकबाबत असुरक्षित जाणवत आहे.

Web Title :- Parenting | parenting warning signs your child is headed for trouble wrong path

हे देखील वाचा :

7th Pay Commission | दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळू शकतात 3 मोठे गिफ्ट, ‘इथं’ जाणून घ्या सर्वकाही

CM Uddhav Thackeray | ‘गरम पाण्याच्या नावाखाली कोमट पाणी’; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भाषणावर ‘मनसे’चा निशाणा

Pune Crime | पुण्यात भाड्याच्या फ्लॅटमध्ये ऑनलाईन जुगाराचा अड्डा ! छापा टाकणार्‍या पोलिसांना धक्काबुक्की; 7 जणांना अटक

Related Posts