IMPIMP

Parth Ajit Pawar | पार्थ पवारांसाठी उद्धव ठाकरे करणार का ‘हा’ त्याग, राष्ट्रवादीकडून नवी मागणी

by nagesh
Parth Ajit Pawar | will cm uddhav thackeray sacrifice maval for parth pawar new demand from ncp

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यातील आगामी निवडणुकांमुळे (Election) आत्तापासूनच राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख (NCP Youth Congress Working President Nitin Deshmukh) यांच्या एका फेसबुक
पोस्टमुळे (Facebook Post) राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून शिवसेनेची (Shivsena) डोकेदुखी वाढली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री
अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार (Parth Ajit Pawar) यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने पार्थ अजित पवार (Parth Ajit Pawar) यांना शुभेच्छा देत नितीन देशमुख यांनी एक वेगळी मागणी करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेने मावळ मतदारसंघ (Maval Loksabha Constituency) हा राष्ट्रवादीला द्यावा अशी मागणी नितीन देशमुख यांनी केली आहे. यासाठी त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली असून या पोस्टची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘महाविकास आघाडीचे आधारस्तंभ उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार (Parth Ajit Pawar) यांच्यासाठी शिवसेनेने मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा’, असे देशमुख यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे.

नितीन देशमुख यांनी पुढे लिहलं की, ‘ज्याप्रमाणे युवानेते, राज्याचे पर्यटन मंत्री मा. अदित्यजी ठाकरे (Aditya Thackeray) साहेबांना वरळीमधून (Worli) उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या कामाचा आवाका आज महाराष्ट्र पाहतोय.
त्याप्रमाणे पार्थदादांनाही एक फेअर चान्स (Fair Chance) मिळाला पाहिजे.
मावळचे माननीय खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne) हे संसदरत्न खासदार आहेत.
त्यांच्या कामाची चुणूक आपण सर्वांनीच पाहिली आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) ठरविल्याप्रमाणे पुढील निवडणूक आघाडी लढणार आहे.
त्यामुळे मावळची जागा ही पार्थ अजित पवार यांना देऊन बारणे यांना महाविकास आघाडीने राज्यसभेत (Rajya Sabha) पाठवावे.’

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Parth Ajit Pawar | will cm uddhav thackeray sacrifice maval for parth pawar new demand from ncp

हे देखील वाचा :

Kareena Kapoor Khan News | करीना कपूर खानचा चेहरा इतका बिघडला.. व्हायरल फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का..!

Drinking Tea in an Empty Stomach | सकाळी-सकाळी उठून रिकाम्यापोटी पित असाल चहा-कॉफी तर आजपासून व्हा सावध, शरीरात होऊ शकते डायजेशनची समस्या

Ameya Khopkar On Amol Mitkari | मनसेचा वर्धापन दिन तिथीनुसार साजरा का नाही करत म्हणणाऱ्या मिटकरींची खोपकरांनी काढली अक्कल; म्हणाले…

Related Posts