IMPIMP

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा; धीरज जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी !!

by nagesh
Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘Pay Fair Trophy’ Championship Under 13 Boys Cricket Tournament; Dheeraj Jadhav Cricket Academy, Brilliants Sports Academy Teams Winning Performance !!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | क्रिक् चॅलेंजर्स तर्फे आयोजित ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत धीरज जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि ब्रिलीयन्टस् स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)

येवलेवाडी येथील बापूसाहेब शेलार क्रिकेट (ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी) मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शंतनु चौहान याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर धीरज जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीने स्पेशलाईज्ड् क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ४१ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना धीरज जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १५१ धावा धावफलकावर लावल्या. रणवीर जाधव (३५ धावा) आणि शुभम पानसे (३१ धावा) यांनी संघाला दिडशे धावांचा टप्पा पार करून दिला. या आव्हानासमोर स्पेशलाईज्ड् क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १०९ धावांवर मर्यादित राहीला. धीरज जाधव संघाचा शंतनु चौहान याने १२ धावात ४ गडी टिपत संघाचा विजय साकार केला. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)

शौर्य जाधव याच्या नाबाद ६१ धावांच्या जोरावर ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने स्पेशलाईज्ड् क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ९ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पेशलाईज्ड् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने आर्दश चोरघडे याच्या ४२ धावांच्या जोरावर १०४ धावांचे आव्हान उभे केले. ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने हे आव्हान १०.३ षटकात व १ गडी गमावून सहज पूर्ण केले. शौर्य जाधव याने ३५ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने नाबाद ६१ धावा केल्या. कर्णधार आर्य कुमावत याने २८ धावांची खेळी केली.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

धीरज जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ६ गडी बाद १५१ धावा (रणवीर जाधव ३५, शुभम पानसे ३१, राजवीर सी. ३-३८) वि.वि. स्पेशलाईज्ड् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २२.४ षटकात १० गडी बाद १०९ धावा (भावेश शिरवी २२, आर्दश चोरघडे १६, शंतनु चौहान ४-१२, दर्शन करंजवणे २-४); सामनावीरः शंतनु चौहान;

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

स्पेशलाईज्ड् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ८ गडी बाद १०४ धावा (आर्दश चोरघडे ४२,
आयुश कुंभारकर १४, अनवय कावणकर २-१०, सिद्धी शेलार २-१२, आर्य कुमावत २-१५)
पराभूत वि. ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीः १०.३ षटकात १ गडी बाद १०५ धावा
(शौर्य जाधव नाबाद ६१ (३५, १२ चौकार, आर्य कुमावत २८); सामनावीरः शौर्य जाधव;

Web Title : Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘Pay Fair Trophy’ Championship
Under 13 Boys Cricket Tournament; Dheeraj Jadhav Cricket Academy,
Brilliants Sports Academy Teams Winning Performance !!

Related Posts