IMPIMP

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा ! एमजीएम क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा सलग दुसरा विजय; ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघाची विजयी सलामी

by nagesh
Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | 'Pay Fair Trophy' Championship Under 13 Children's Cricket Tournament! MGM Cricket Academy's second win in a row; Brilliants Sports Academy team's winning salute

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | क्रिक् चॅलेंजर्स तर्फे आयोजित ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद
१३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत एमजीएम क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने सलग दुसरा तर, ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघाने प्रतिस्पर्धी संघाचा
पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

येवलेवाडी येथील बापूसाहेब शेलार क्रिकेट (ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी) मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कर्णधार आर्य कुमावत याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने नाशिक जिमखाना संघाचा निसटता पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना नाशिक जिमखाना संघाने समर परदेशी (६३ धावा) आणि श्री बोंबाळे (२७) यांच्या धावांच्या योगदानाच्या जोरावत १३० धावांचे आव्हान उभे केले. ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने हे आव्हान २४.४ षटकात व ९ गडी गमावून पूर्ण केले. विजयासाठी आर्य कुमावत (१८ धावा), अनवय कवाणकर (नाबाद १७ धावा) आणि शौर्य जाधव (१३ धावा) यांची फलंदाजी उपयुक्त ठरली. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)

स्वरीत धरक याच्या ७४ धावांच्या खेळीच्या जोरावर एमजीएम क्रिकेट अ‍ॅकॅडमीने धीरज जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ४३ धावांनी सहज पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. एमजीएम क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८५ धावा धावफलकावर लावल्या. स्वरीत धरक याने ५२ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकारासह ७४ धावा चोपल्या. त्याला श्रर्व सोवनी (३४ धावा) आणि सोहम गिरी (२५ धावा) यांनी सुरेख साथ दिली. या आव्हानासमोर धीरज जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १४२ धावांवर मर्यादित राहीला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
नाशिक जिमखानाः २५ षटकात ६ गडी बाद १३० धावा (समर परदेशी ६३ (५९, ११ चौकार), श्री बोंबाळे २७,
श्रेयस हेकारे २१, आर्यन देवडकर २-१७, आर्य कुमावत १-२४) पराभूत वि. ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीः २४.४ षटकात
९ गडी बाद १३१ धावा (आर्य कुमावत १८, अनवय कवाणकर नाबाद १७, शौर्य जाधव १३, गुरप्रीत सिंग ४-२४,
भाव्य बडमुथा २-१४, अवांतर धावा ३२); सामनावीरः आर्य कुमावत;

एमजीएम क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २३ षटकात ७ गडी बाद १८५ धावा (स्वरीत धरक ७४ (५२, १३ चौकार, १ षटकार),
श्रर्व सोवनी ३४, सोहम गिरी २५, अनीश दिक्षीत २-३६, अर्णव कोतवाल २-९) वि.वि. धीरज जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २३
षटकात ४ गडी बाद १४२ धावा (राजवीर जाधव ३९, हृषीकेश देशपांडे २१, वेदांत काटकर २-१८); सामनावीरः
स्वरीत धरक;

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘Pay Fair Trophy’ Championship Under 13 Children’s Cricket Tournament! MGM Cricket Academy’s second win in a row; Brilliants Sports Academy team’s winning salute

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime News | मावळमधील उद्योगपती व तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यावर भरदिवसा गोळीबार, कोयत्याने वार करून खून

Devendra Fadnavis | ‘भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर…’, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना इशारा (व्हिडिओ)

NCP Ajit Pawar On Congress Nana Patole | ‘…तर 16 आमदार निलंबित झाले असते’, अजित पवारांनी साधला नाना पटोलेंवर निशाणा (व्हिडिओ)

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – दारु पिऊन शिवीगाळ करणार्‍या वडिलांचा मुलाने केला खून

Related Posts