IMPIMP

PCMC BJP | पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला झटका ! पक्षांतर्गत राजकारणाला वैतागून नगरसेवकाचा राजीनामा

by nagesh
PCMC BJP | BJP in Pimpri-Chinchwad Corporator Vasant Borate resigns due to party politics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक Pimpri Chinchwad Municipal Corporation Elections (PCMC Elections) अवघ्या काही महिन्यांवर आली असताना पिंपरी चिंचवड भाजपला (PCMC BJP) झटका बसला आहे. प्रभाग क्रमांक दोनचे मोशी-जाधववाडी (Moshi-Jadhavwadi) भागाचे प्रतिनिधीत्व करणारे वसंत बोराटे यांनी भाजप नगरसेवक (Corporator Vasant Borate) पदाचा राजीनामा (Resignation) दिला आहे. प्रभागाच्या विकासासाठी सहकार्य केले नाही. तसेच पक्षात काम करताना स्वाभिमान दुखावला जात असल्याचे सांगत नगरसेवक वसंत बोराटे यांनी आज (बुधवार) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बोराटे यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Municipal Commissioner Vikas Dhakane) यांच्याकडे राजीनामा दिला आहे. बोराटे यांच्या राजीनाम्यामुळे पिंपरी चिंचवड भाजपला (PCMC BJP) मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वसंत बोराटे हे प्रभाग दोन मोशी – जाधवाडी भागातून 2017 मध्ये भाजपच्या चिन्हावर महापालिकेवर निवडून आले होते. बोराटे हे शांत व संयमी राजकारणी म्हणून ओळखले जातात. मागील पाच वर्षात बोराटे यांना आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landage) यांनी पदासाठी खेळवत ठेवल्याची चर्चा आहे. मध्यंतरी नाराज असलेल्या बोराटे यांना विधी समितीच्या सदस्यपद देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बोराटे यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला.

वसंत बोराटे यांना महापौर (Mayor), उपमहापौर (Deputy Mayor), स्थायी समिती सदस्य (Standing Committee Member), विषय समिती सभापती (Subject Committee Chairman), प्रभाग समिती अध्यक्ष (Ward Committee Chairman) असे कोणतेही पद दिले नसल्याने त्यांची नाराजी वाढली होती.
याच नाराजीतून त्यांनी पिंपरी चिंचवड भाजपला (PCMC BJP) सोडचिठ्ठी दिली आहे.
वसंत बोराटे यांनी राजीनामा दिल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत बोलताना वसंत बोराटे म्हणाले, भाजपमध्ये काम करत असताना स्वाभिमान दुखावला जात होता.
शेवटपर्यंत पक्षाने सन्मान दिला नाही. तसेच सन्मानाची वागणूक दिली नाही.
अशीच मानसिकता आणि खदखद अनेक नगरसेवकांच्या मनात आहे.
मात्र, ते स्पष्टपणे बोलू शकत नाहीत. मोशी-जाधववाडी भागाच्या विकासासाठी, जनतेसाठी मला हा निर्णय घ्यावा लागत असून आपली पुढची राजकीय भूमिका लवकरच जाहीर करु असे बोराटे यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- PCMC BJP | BJP in Pimpri-Chinchwad Corporator Vasant Borate resigns due to party politics

हे देखील वाचा :

Narayan Rane On Sanjay Raut | ‘संजय राऊतांचा मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर डोळा, राष्ट्रवादीकडून सुपारी’ – नारायण राणे (व्हिडीओ)

Kirit Somaiya Vs Sanjay Raut | सोमय्या आणि राऊत वादातील ‘त्या’ 19 बंगल्यांबाबत ‘कोलई’च्या सरपंचाने केला मोठा खुलासा

Multibagger Stocks | ‘हा’ शेअर्स देतोय जबरदस्त परतावा ! 15 रुपयांचा शेअर 2000 रुपयांवर; 1 लाख गुंतवणारे बनले कोट्यधीश, जाणून घ्या

Related Posts