IMPIMP

PCMC Recruitment | पिंपरी चिंचवड महापालिका नोकरभरती; 386 जागांसाठी सव्वालाखांहून अधिक उमेंदवारांचे अर्ज ; उमेदवारांना परिक्षा शुल्क भरण्यासाठी दिली मुदतवाढ

by nagesh
PCMC Recruitment | Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन PCMC Recruitment | पिंपरी-चिंचवड महापालिकेत मेगा नोकरभरती काढण्यात आली आहे. विविध विभागांतील ब आणि क गटातील 16 पदांच्या 386 जागा भरण्यासाठी (PCMC Recruitment) सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन अर्ज (Online Application) भरण्यासाठी 19 सप्टेंबरपर्यंत मुदत होती. या मुदतीमध्ये तब्बल 1 लाख 30 हजार उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्य सरकारने (State Government) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोकर भरतीवरील (Pimpri-Chinchwad Municipal Corporation Recruitment) निर्बंध उठविले आहेत. त्यानंतर प्रशासनाने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली. रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेने सरळ सेवेने भरती प्रक्रिया(PCMC Recruitment) करण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये 386 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याकरिता 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेतपर्यंत मुदत होती. त्या मुदतीमध्ये विविध पदासांठी 1 लाख 30 हजार 470 उमेदवारांनी विविध पदांसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी 84 हजार 847 उमेदवारांनी परीक्षा शुल्क जमा केले आहे. तर उर्वरित 45 हजार 623 उमेदवारांनी अद्याप परीक्षा शुल्क भरले नाही. त्या उमेदवारांसाठी 26 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.

या भरतीमध्ये लिपिकाच्या 213 जागांसाठी सर्वाधिक 51 हजार 161, तर कनिष्ठ अभियंत्याच्या 75 जागांसाठी
तब्बस 43 हजार 412 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या नोकरभरतीसाठी येत्या नोव्हेंबरअखेर परिक्षा घेतली जाणार
आहे. ही परिक्षा टीएससी कंपनीमार्फत होणार आहे.

Web Title :- PCMC Recruitment | Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | जयंत पाटील यांच्या टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘दर 15 दिवसांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीला जावे’

Pune ACB Trap | ग्रामविकास अधिकाऱ्याकडून 30 हजार रुपये लाच घेताना सहायक लेखा परीक्षा अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Related Posts