IMPIMP

Pegasus | पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी SC स्थापन करणार तज्ज्ञांची समिती

by nagesh
OBC Political Reservation In Maharashtra | obc reservation decision for 92 municipal councils postponed special bench to be constituted for hearing

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPegasus | मागील काही महिन्यापासून पेगासस हेरगिरी प्रकरणावरुन (Pegasus espionage case) अधिवेशनादरम्यान राज्यसभेत गदारोळ माजला होता. त्यावेळी या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी विरोधक आक्रमक होत केंद्र सरकारवर (Central Government) टीका करत होते. तर नुकतंच संपूर्ण प्रकरणाची तज्ज्ञ समिती स्थापन करून चौकशी केली जाऊ शकते. असं केंद्राकडून सांगण्यात आलं होतं. यातच आता पेगासस (Pegasus) हेरगिरी प्रकरणाची चौकशीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा (Chief Justice N.V. Ramana) यांनी महत्वपुर्ण माहिती दिली आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्ट (Supreme Court) लवकरच तज्ज्ञांची समिती स्थापन करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा (Chief Justice N.V. Ramana) यांनी गुरुवारी झालेल्या एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीबाबत माहिती दिली आहे.
तर, ही समिती कशी असेल आणि तपास कसा पुढे केला जाईल यासंदर्भात सविस्तर आदेश पुढील आठवड्यात येऊ शकणार आहे.
तर, काही तज्ज्ञांना समितीमध्ये भाग घेण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे.
परंतु त्यापैकी बरेच जण वैयक्तिक कारणांमुळे समितीमध्ये भाग घेऊ शकत नाहीत.
प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्ट (Supreme Court) या आठवड्यात
एक समिती स्थापन करू इच्छित आहे.
या समितीमध्ये ज्या लोकांचा समावेश करायचा आहे, त्यापैकी काही लोकांनी समावेश होण्यास नकार दिला आहे. तसेच, याबाबतचा आदेश पुढील आठवड्यापर्यंत येऊ शकतो.
असं सरन्यायाधीशांनी सांगितलं आहे.

पेगासस हेरगिरीच्या (Pegasus espionage case) यादीत काँग्रेसचे खा. राहुल गांधी, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर आणि इतर नेते, अनेक पत्रकार आणि काही केंद्रीय मंत्र्यांची नावे होती.
त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, यासाठी काँग्रेस आक्रमक होता.
तर या प्रकारणाची तज्ज्ञ समिती स्थापन करून चौकशी केली जाऊ शकते.
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपूर्वी पेगासस हेरगिरी प्रकरणाचा मुद्दा समोर आला होता.
आंतरराष्ट्रीय मीडिया संस्थांनी दावा केला होता की, भारत सरकारने (Central Government)
इस्रायली स्पायवेअरच्या आधारे देशातील अनेक राजकारणी, पत्रकार आणि देशातील इतर
सेलिब्रिटींची हेरगिरी करण्यात आली होती. पंरतु केंद्राने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

(Pegasus) म्हणजे काय?

पेगासस हा स्पायवेअरचा एक प्रकार आहे. पेगाससला (Pegasus) इस्त्रायली सर्विलांस कंपनी NSO Group ने विकसित केले आहे. हे लोकांच्या फोनद्वारे त्यांची हेरगिरी करते.
पीबीएनएसच्या अहवालानुसार, पेगासस एक लिंक पाठवते आणि जर वापरकर्त्याने त्या लिंकवर क्लिक केले तर त्याच्या फोनवर मालवेअर किंवा देखरेखीसाठी परवानगी असलेला कोड इन्स्टॉल होतो.
असे सांगितले जात आहे की मालवेअरच्या नवीन आवृत्तीसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करणे आवश्यक नाही. एकदा पेगासस इन्स्टॉल झाल्यानंतर, हल्लेखोराकडे वापरकर्त्याच्या फोनची संपूर्ण माहिती असते.

Web Title : Pegasus | pegasus snooping row sc set probe panel formal order next week

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील कोरेगाव पार्क, बंडगार्डन, येरवडा, खडक, समर्थ, लष्कर, वानवडी आणि कोंढवा येथील उच्चभ्रू सोसायट्यांत 11 चोर्‍या; घरकाम करणार्‍या महिलेकडून 61 लाखाचा माल जप्त

OMG | दारूची नशा चढल्यानंतर ‘या’ कारणामुळे इंग्रजी बोलू लागतात लोक, रिसर्चमध्ये हैराण करणारा खुलासा

Aurangabad Crime | विहिरीत पडलेल्या मुलीला मयत ठरून बापानेच परस्पर पुरल्याचा संशय; औरंगाबादमधील खळबळजनक प्रकार

Related Posts