IMPIMP

नोव्हेंबरमध्येच नोकरदार आणि Pensioner ने उरकून घ्यावीत ‘ही’ सर्वात महत्वाची कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

by nagesh
Pensioner | november important tasks pensioners submit life certificate epfo uan aadhaar linking lic home loan

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Pensioner, नोकरदार लोकांसाठी महत्वाची बातमी आहे. त्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत दोन महत्वाची कामे उरकायची आहेत. यातून Pensioner पेन्शन रखडण्यापासून वाचतील आणि नोकरदारांना PF वर 7 लाखाच्या विमा कव्हरचा लाभ मिळत राहील. या सोबतच Home Loan पाहिजे असेल तर तुमच्यासाठी सुद्धा एक एक ऑफर 30 नोव्हेंबरला संपत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

UAN-Aadhaar Link

युनिव्हर्सल अकाऊंट नंबर म्हणजे UAN आधार नंबर (Aadhaar) सोबत संलग्न करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे.
Aadhaar आणि UAN लिंकिंग जर 1 डिसेंबरपूर्वी केले नाही तर EPFO मेंबर्सचे मोठे नुकसान होऊ शकते.

जर एखाद्या कर्मचार्‍याचे पीएफ अकाऊंट आधारसोबत लिंक केले नसेल तर त्याचे पीएफचे पैसे जमा होणार नाहीत आणि कर्मचारी आपल्या PF Account तून पैसे काढू शकणार नाहीत.

तुमचे खाते आधारसोबत लिंक नसल्यास कर्मचार्‍याचे एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स (EDLI) सुद्धा जमा होऊ शकणार नाही.
यामुळे कर्मचारी विमा कव्हरच्या बाहेर जाईल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम, 1976 (EDLI Scheme) अंतर्गत देण्यात येणार्‍या विमा रक्कमेची मर्यादा आता 6 लाखावरून वाढून 7 लाख रुपये करण्यात आली आहे.
म्हणजे आता तुम्हाला फ्रीमध्ये 7 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.
ईपीएफओ (EPFO) कडून आपल्या सबस्क्रायबर्सला जीवन विम्याची सुविधा दिली जाते.

Life Certificate ची सक्ती

Pensioner साठी लाईफ सर्टिफिकेट सर्वात आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे.
वेळेवर ते जमा न केल्यास पेन्शन अडकू शकते. पेन्शनर्सला आपली पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी 30 नोव्हेंबरपर्यंत आपला हयातीचा दाखला म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट जमा करावे लागते.
जीवन प्रमाणपत्र पोर्टल E praman वर आपले लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता.

Home Loan ची सूट

LIC हौसिंग फायनान्सने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाचा दर कमी करून 6.66 टक्के केला आहे.
हा दर 700 किंवा त्यापेक्षा जास्त सिबिल स्कोअर असणार्‍यांसाठी आहे. हा व्याजदर 22 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Pensioner | november important tasks pensioners submit life certificate epfo uan aadhaar linking lic home loan

हे देखील वाचा :

Sanjay Raut | संजय राऊतांचं मोठं भाकित, म्हणाले – ‘2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 48 पैकी 45 जागा जिंकेल’

Pune Crime | कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करुन स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली 84 लाखांना गंडा; पुण्याच्या शिवाजीनगर गावठाणातील घटना

Pune NCP | ‘लसीकरणाचे योगदान देत आहेत पुनावाला आणि बॅनरबाजी करत आहेत चूनावाला’, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘थँक्यू टॅक्स पेयर’ बॅनर लावून निषेध

Related Posts