IMPIMP

Petrol Diesel CNG Price Hike In Pune | सीएनजी वाहन चालकांना मोठा झटका ! राज्य शासनाने दिलेला दिलासा तेल कंपन्यांनी घेतला हिरावून; सीएनजीच्या किंमतीत 5.80 रुपयांनी वाढ, जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

by nagesh
Petrol Diesel CNG Price Hike In Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPetrol Diesel CNG Price Hike In Pune | राज्य शासनाने १ एप्रिलपासून व्हॅटच्या दरात घट केल्याने सीएनजीचे दर प्रति किलो ६ रुपये ३० पैशांनी घटले होते. हा दिलासा केवळ पाच दिवसच टिकला. तेल कंपन्यांनी सीएनजीच्या दरात एकाच दिवशी ५ रुपये ८० पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे व्हॅट कमी केल्याचा दिलासा औट घटकेचा ठरला आहे.
राज्य शासनाने व्हॅट (VAT) कमी केल्याने सीएनजीचा प्रति किलो दर ६२.२० रुपयांपर्यंत खाली आला होता. तेल कंपन्यांनी त्यात वाढ केल्याने आजपासून सीएनजीचा दर ६८ रुपये किलो झाला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सीएनजी गॅसच्या मिश्रणात एका विशिष्ट आयात करण्यात येणार्‍या वायूची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात दुप्पट झाली आहे. त्यामुळे ही मोठी दरवाढ करण्यात येत असल्याचे  ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले आहे.

राज्य शासनाने व्हॅटवरील करात १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांपर्यंत कमी केला होता.
त्यामुळे सीएनजी व घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस स्वस्त झाला  होता.
पण, तेल कंपन्यांनी दरवाढ करुन हा दिलासा खावून टाकला आहे.
सीएनजीबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात लिटरमागे ८३ पैशांची वाढ करण्यात आली आहे. पुण्यात बुधवारी पेट्रोलचा दर ११९.९६ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातही ८३ पैशांनी वाढ झाली असून आता पॉवर पेट्रोलचा दर १२४.४६ रुपये लिटर झाला आहे. (Petrol Diesel CNG Price Hike In Pune)

डिझेलच्या दरातही लिटरमागे ८३ पैशांनी वाढ झाली आहे. डिझेलचा दर आता १०२.६७ रुपये लिटर झाला आहे.
ही दरवाढ अजूनही सुरुच राहणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.

Web Title :- Petrol Diesel CNG Price Hike In Pune

हे देखील वाचा :

Samantha Ruth Prabhu Hot Photo | पारदर्शक शर्ट घालून समंथानं दिल्या बोल्ड पोज, फोटोने इंटरनेटचं वाढवलं तापमान..

Pune News | वडीलांचा आनंद गगनात मावेना; थेट हेलिकॉप्टरमधून आणलं चिमुकलीला घरी

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! पत्नी बेडरुमध्ये चाकू घेऊन झोपली, घाबरलेल्या पतीची थेट पोलिसांत धाव

Related Posts