IMPIMP

सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ ! 23 वेळा वाढले पेट्रोल डिझेलचे भाव, जाणून घ्या नवे दर

by omkar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Petrol-Diesel Price | तेल कंपन्यांनी आज सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ (petrol diesel price) केली आहे. शुक्रवारी पेट्रोलच्या दरात २८ पैशांनी वाढ करण्यात आली होती.
शनिवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचा दर आता १०१.९७ प्रति लिटर झाला आहे.

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

मुंबईत पेट्रोलचा दर आज १०२.३० रुपये लिटर, चेन्नईमध्ये ९७.४३ रुपये, दिल्लीमध्ये ९६.१२ रुपये लिटर झाला आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर २३ पैशांनी वाढ झाली आहे.
आता डिझेल ९२.६० रुपये लिटर झाले आहे.
मुंबईत डिझेलचा दर ९४.३९ रुपये लिटर झाला आहे.
चेन्नईत ९१.६४ रुपये, कोलकत्ता ८९.८३ रुपये, दिल्लीत ८६.९८ रुपये लिटर झाला आहे.

Monsoon | Weather Alert ! पुण्यात पुढील 4 दिवस मुसळधार; रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार

४ मे पासून पेट्रोल व डिझेलच्या दरात नियमितपणे वाढ होत आहे.
१२ जूनपर्यंत तब्बल २३ वेळा इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे देशभरात पेट्रोल व डिझेलचे भाव विक्रमी स्तरावर पोहचले आहेत.
४ मे ते ११ जूनपर्यंत पेट्रोलच्या दरात ५.४५ रुपये लिटर आणि डिझेलच्या दरात ६.०२ रुपये लिटर महागले आहे.

Husband Killed Wife | नवरा – बायको एकत्र बसून पित होते दारू; पतीने पत्नीचा गळा धारदार शस्त्राने कापला

Web Title : Petrol, diesel prices hike for second day in a row 23 times increase in petrol and diesel prices, know the new rates

Related Posts