IMPIMP

Petrol-Diesel Rates Reduced | केंद्र सरकारनंतर राज्याचा देखील मोठा निर्णय ! पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त, जाणून घ्या

by Team Deccan Express
Petrol-Diesel Rates Reduced | Big decision of the state after the central government! Petrol and diesel even cheaper, learn

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Petrol-Diesel Rates Reduced | इंधनदरवाढीने होरपळलेल्या वाहनधारकांना केंद्र सरकारने (Central Government) काल मोठा दिलासा दिला. पेट्रोल 9.5 रुपयांनी तर डीझेल 7 रुपयांनी स्वस्त केले. आता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही (Maharashtra State Government) इंधनावरील दर कमी (Petrol-Diesel Rates Reduced) करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल 2 रूपये 8 पैसे तर डिझेल 1 रुपये 44 पैशांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर (Excise Tax) कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात (Petrol-Diesel Rates Reduced) केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.

मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.

Web Title :- Petrol-Diesel Rates Reduced | Big decision of the state after the central government! Petrol and diesel even cheaper, learn

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts