IMPIMP

Petrol Price | केजरीवाल सरकारकडून दिल्लीकरांना मोठा दिलासा ! पेट्रोल 8 रूपयांनी स्वस्त, महाराष्ट्रात ठाकरे सरकारकडून अद्याप निर्णय नाही

by nagesh
Maharashtra Petrol-Diesel Price | maharashtra petrol diesel price 15th july 2022 check latest rate full list mumbai pune nashik nagpur

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादिल्लीच्या केजरीवाल सरकारने (Kejriwal Government) दिल्लीकरांना मोठा दिलासा दिला आहे. दिल्लीत सरकारने व्हॅट कमी करुन पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त (Petrol Price) केले आहे. पेट्रोलवरील व्हॅट (VAT) (मूल्यवर्धित कर) 30 टक्क्यांवरुन 19.40 टक्के केला आहे. त्यामुळे दिल्लीत (Delhi) पेट्रोलच्या किमती (Petrol Price) कमी झाल्या आहेत. सध्या दिल्लीत 103.97 रुपये प्रति लिटर पेट्रोल मिळत होते. मात्र आता व्हॅट कमी केल्याने पेट्रोलचे दर 95.97 रुपये झाले आहेत. पेट्रोलचे हे नवे दर आज (बुधवार) रात्री 12 वाजल्यापासून लागू होतील. दरम्यान, महाराष्ट्रातील ठाकरे सरकारकडून (Thackeray Government) याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट (petrol and diesel VAT) कमी करण्याच्या निर्णयाला दिल्ली सरकारने आज कॅबिनेट बैठकीत (cabinet meeting) मंजुरी दिली आहे. यापूर्वी राजस्थान (Rajasthan) आणि छत्तीसगडमध्येही (Chhattisgarh) पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात आला आहे. त्यानंतर आता दिल्लीतही हे पाऊल उचलण्यात आले हे. सध्या दिल्लीत एक लिटर पेट्रोल 103.97 दराने उपलब्ध आहे. तर नोएडामध्ये (Noida) पेट्रोलचा प्रति लिटर दर 95.51 आणि गुरुग्राममध्ये (Gurugram) 95.90 रुपये आहे. त्यामुळे दिल्लीतील फिलिंग स्टेशनवर ग्राहकांची कमतरता होती. बहुतांश ग्राहक यूपी आणि हरियाणातून तेल आणत होते. (Petrol Price)

महाराष्ट्रातील जनतेला कधी दिलासा मिळणार?
वर्षाच्या सुरुवातीपासूनच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत होते. पण, दिवाळीनिमित्त मोदी सरकारने (Modi government) उत्पादन शुल्कात पाच आणि दहा रुपयांची कपात केली होती. त्यामुळे देशातील अनेक राज्यांनी व्हॅट कमी केल्याने तेलाच्या किमती घसरल्या. मात्र अद्याप महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात आले नाहीत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे दर

पुणे (Pune) – पेट्रोल 109.31 आणि डिझेल 92.31 प्रति लीटर

मुंबई (Mumbai) – पेट्रोल 109.98 आणि डिझेल 94.14 प्रति लीटर

नागपूर (Nagpur) – पेट्रोल 109.71 आणि डिझेल 92.53 प्रति लीटर

औरंगाबाद (Aurangabad) – पेट्रोल 111.64 आणि डिझेल 95.79 प्रति लीटर

कोल्हापूर (Kolhapur) – पेट्रोल 110.09 आणि डिझेल 92.89 प्रति लीटर

नाशिक (Nashik) – पेट्रोल 110.40 आणि डिझेल 93.16 प्रति लीटर

Web Title :- Petrol Price | petrol cheaper rs 8 delhi kejriwal governments decision what about maharashtra yet not thackeray government take

हे देखील वाचा :

7th Pay Commission | न्यायाधीशांसंबंधी विधेयक LS मध्ये सादर, जाणून घ्या – ‘कधी मिळेल फॅमिली पेन्शनचा हा अधिकार’

World Aids Day 2021 | शरीरात दिसत असतील ‘ही’ 7 लक्षणे तर असू शकतो एड्सचा संकेत, असा करा बचाव

Google Online Payment Rule | RBI च्या नियमानंतर Google ने बदलला नियम, ऑनलाईन पेमेंट करणार्‍यांच्या वाढू शकतात अडचणी !

Related Posts