IMPIMP

Petrol Price Today | पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या मुंबई-पुण्यासह इतर प्रमुख शहरांतील 1 लीटरचे दर

by omkar
Petrol Price Today

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Petrol Price Today  | एक दिवस दिलासा मिळाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) च्या दरात आज पुन्हा वाढ केला आहे. सोमवारी पेट्रोलच्या किंमतीत 29 पैसे प्रति लीटर तर डिझेलच्या किमतीत (Diesel Price Today) 30 पैशांची वाढ झाली आहे. याशिवाय इंटरनॅशनल मार्केटमध्ये वाढत्या कच्च्या तेलाच्या मागणीमुळे या दरांमध्ये वाढ दिसून येत आहे.
इंधनाच्या किमतीत तेजी आल्यानंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.41 रुपये प्रति लीटर तर डिझेल 87.28 रुपये प्रति लीटरवर पोहचले आहे.

Coronavirus Patient |फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

Petrol Price Today | पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 4 मेपासून च्या वाढीनंतर किमती विक्रमी स्तरावर पोहचल्या आहेत. आतापर्यंत पेट्रोल 25 दिवसात 6.09 रुपये प्रति लीटर महागले आहे. तर, डिझेल 25 दिवसात 6.30 रुपये प्रति लीटरपर्यंत महाग झाले आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले असून मोदी सरकारविरोधातील संताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

महानगरांमध्ये 1 लीटर पेट्रोल-डिझेलचे भाव
इंडियन ऑईल (Indian Oil) च्या वेबाइटनुसार, आज मुंबईत पेट्रोल 102.58 रुपये आणि डिझेल 94.70 रुपये, कोलकातामध्ये पेट्रोल 96.34 रुपये आणि डिझेल 90.12 रुपये आणि चेन्नईत पेट्रोलची किंमत 97.69 रुपये आणि डिझेल 91.92 रुपये आहे.

या शहरांमध्ये 100 रुपयांच्या वर गेला भाव

अनेक शहरे जसे की, हैद्राबाद, मुंबई, जयपुर, भोपाळ, श्रीगंगा नगर आणि रिवामध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. येथे पेट्रोलचा भाव 3 डिजिटपर्यंत पोहचला आहे.

Horoscope 14 june 2021 | 14 जून राशीफळ : आज पुष्ययोग, ‘या’ 7 राशींना होणार धनलाभ, इतरांसाठी असा आहे सोमवार

पुणे –

आज पुण्यात पेट्रोलचा दर १०२.२४ रुपये लिटर इतका झाला आहे.
डिझेलच्या दरात आज लिटरमागे ३० पैशांनी वाढ झाली आहे.
डिझेलचा दर आता ९२.९१ रुपये लिटर झाला आहे.
पॉवर पेट्रोलच्या दरात लिटरमागे २८ पैशांनी वाढ झाली आहे.
पॉवर पेट्रोलचा दर प्रति लिटर १०५.९१ रुपये झाला आहे.

डिझेलमध्ये होत असलेल्या दरवाढीचा मोठा परिणाम माल वाहतूक होण्याची शक्यता आहे. वाहतूक खर्च वाढल्याने सर्वच प्रकारच्या मालाच्या किंमतीत वाढ होऊन महागाई वाढण्यात होत आहे.
देशभरात सुमारे ३० कोटी वाहनांची संख्या असून त्यापैकी डिझेलवरील वाहनांची संख्या ४ कोटी इतकी आहे.
तर पेट्रोलवरील वाहनांची संख्या २२ कोटी १८ लाखांहून अधिक आहे.
अवजड माल वाहतूक करणारी ४६ लाख वाहने देशभरातील रस्त्यांवरुन धावत असतात.
पेट्रोलच्या तुलनेत डिझेलमध्ये सातत्याने अधिक वाढ होत असल्याने डिझेलवरील वाहनांच्या संख्येत घट झाली आहे.

30 जूनपूर्वी करून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे अन्यथा लागेल मोठा दंड, सोबतच बँक खाते आणि PAN कार्ड होईल बंद

Web Title: Petrol Price Today | Petrol-diesel prices rises again,
know the price of 1 liter in Mumbai-Pune and other major cities

Related Posts

Leave a Comment