IMPIMP

PF Account e-Nomination Filing | PF खातेधारकांसाठी महत्वाची माहिती ! ई-नॉमिनेशन केल्यास मिळतील 3 फायदे, नेमकी प्रक्रिया काय ? जाणून घ्या

by Team Deccan Express
PF Account e-Nomination Filing | epf account 3 benefits of filing e nomination in epf account heres step by step process

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – PF Account e-Nomination Filing | पीएफ खातेधारकांसाठी (PF Account Holder) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) अनेक सूचना वेळोवेळी दिल्या जात असतात. त्याचबरोबर कंपनीकडून अनेक सुविधा आणि अपडेट्स दिले जाते. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कंपनी आणि सरकारकडून अनेक फायदे देखील देण्यात येते. दरम्यान, आता सर्व पीएफ खातेधारकांनी त्यांच्या खात्यात नॉमिनी (PF Account e-Nomination Filing) जोडणे आवश्यक आहे. असं सांगण्यात आलं आहे.

EPFO मागील काही काळापासून ई-नॉमिनेशनसाठी (e-Eomination) विशेष मोहीम राबवत आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचे उद्दिष्ट पीएफ खातेधारकांच्या कुटुंबांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे असल्याचं सांगण्यात येतय. या दरम्यान, पीएफ खातेधारकांनो नाॅमिनेशन केल्यास तीन फायदे मिळतात. याबाबत सविस्तर जाणून घ्या. (PF Account e-Nomination Filing)

– तुम्ही PF खात्यात नॉमिनीचे नाव जोडले, तर तुमच्या कुटुंबाला 7 लाख रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. EPFO सदस्याच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम दिली जाते. EPF कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास नॉमिनी अथवा कायदेशीर वारस विम्यासाठी दावा करू शकतात. या योजनेअंतर्गत किमान विम्याची रक्कम 2.5 लाख रुपये आहे. तसेच, कमाल विम्याची रक्कम सात लाख रुपये आहे.

– कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर ऑनलाइन दावा करू शकतात.

– ही सर्व प्रक्रिया पेपरलेस प्रकारे होईल आणि दावा लवकर सेटल केला जाईल.

नेमकी प्रक्रिया काय आहे ? (ऑनलाइन PF नोंदणी करण्यासाठी)

– प्रथम तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल.

– त्यानंतर ‘सेवा’ वर जा आणि ‘कर्मचाऱ्यांसाठी’ टॅब निवडा

– सेवांमध्ये ‘सदस्य UAN/ऑनलाइन सेवा (OCS/OTCP)’ तपासा

– तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा

– ‘व्यवस्थापित करा’ टॅब अंतर्गत ‘ई-नामांकन’ हा पर्याय निवडा

– कुटुंब घोषणा अद्यतनित करण्यासाठी ‘होय’ वर क्लिक करा

– ‘कौटुंबिक तपशील जोडा’ वर क्लिक करा

– एकूण रकमेचा भाग घोषित करण्यासाठी ‘नामांकन तपशील’ वर क्लिक करा.

– घोषणेनंतर ‘सेव्ह ईपीएफ नामांकन’ वर क्लिक करा.

– OTP मिळविण्यासाठी ‘ई-चिन्ह’ वर क्लिक करा.

– तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो भरा

– ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, EPFO वर तुमची ई-नामांकन नोंदणी पूर्ण होईल.

Web Title :- PF Account e-Nomination Filing | epf account 3 benefits of filing e nomination in epf account heres step by step process

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts