IMPIMP

PF Balance | पीएफ बॅलन्स चेक करणे खुपच सोपे, मिस्ड कॉलने सुद्धा मिळू शकते माहिती; जाणून घ्या

by nagesh
PF Balance | pf balance check through missed call epfo 4 ways to check details here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PF Balance | जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO मध्ये देखील खाते असेल, ज्यामध्ये तुमच्या पगाराचा काही भाग जमा केला जातो. पगारदार लोकांसाठी, पीएफची रक्कम (PF Amount) ही त्यांची आयुष्यभराची कमाई असते. ईपीएफओ सदस्य त्यांच्या पीएफ बॅलन्स घरी बसून तपासू शकतात. यासाठीच्या पद्धती जाणून घेवूयात. (PF Balance)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

1- मिस कॉलद्वारे (Via Miss Call)
पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल.

2- SMS द्वारे
एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अ‍ॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल. (PF Balance)

3. EPFO वेबसाइटद्वारे

यासाठी EPFO वेबसाइटवर जा.

येथे Employee Centric Services वर क्लिक करा.

आता View Passbook वर क्लिक करा.

पासबुक पाहण्यासाठी UAN द्वारे लॉगइन करा.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

4. UMANG APP द्वारे

उमंग अ‍ॅप ओपन करा.

यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडा.

Employee Centric Services निवडा.

आता UAN & PASSWORD टाका.

यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त होईल, तो टाका.

यानंतर व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता.

Web Title :- PF Balance | pf balance check through missed call epfo 4 ways to check details here

हे देखील वाचा :

Henley Passport Index 2022 | वाढला भारतीय पासपोर्टचा रुतबा ! आता तुम्ही 59 देशात जाऊ शकाल विना व्हिसा

Restrictions In Pune | कोरोनाचे निर्बंध वाढणार का? पुण्यातील आढावा बैठकीनंतर अजित पवार म्हणाले…

Low Haemoglobin Level | रक्ताची कमतरता असल्यास शरीर देते ‘हे’ 5 संकेत, ही लक्षणे आढळली तर व्हा सावध

Related Posts