IMPIMP

Phone Tapping Case | IPS रश्मी शुक्लांविरोधात सरकारकडे कोणताही पुरावा नाही; वकिलाचा उच्च न्यायालयात युक्तिवाद

by bali123
IPS Rashmi Shukla | ajit pawar slams cm eknath shinde phone tapping case maharashtra assembly winter session

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Phone Tapping Case | मुंबई सायबर सेलने फोन टॅपिंग व गोपनीय माहिती फोडल्याबद्दल अज्ञात लोकांविरोधात गुन्हा (Phone Tapping Case) नोंदविला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी ज्येष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे झाली.

यावेळी ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी (mahesh jethmalani) यांनी शुक्ला यांच्यातर्फे युक्तीवाद करताना फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. वाईट हेतून राज्य सरकार कारवाई करत आहे. शुक्ला यांनी एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे कोणताही गुन्हा केला नाही. जरी असे गृहीत धरले की शुक्ला यांनी गुन्हा केला तरी त्यात जनहित आहे, असे जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितले. दरम्यान, पोलीस नियुक्त्या व बदल्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारासंबंधी अहवाल सादर केल्याने राज्य सरकार शुक्ला यांना लक्ष्य करत आहे आणि बळीचा बकरा बनवत आहे, असेही जेठमलानी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी युक्तीवाद करताना, शुक्ला यांनी केलेले आरोप चुकीचे असून त्यांनी जनहिताचे काम केले आहे,
तर याप्रकरणी गुन्हा रद्द करण्याची मागणी करण्यापेक्षा त्यांनी याची चौकशी करण्याचा आग्रह केला पाहिजे, असे खंबाटा यांनी म्हंटले.
राज्य
सरकारने शुक्ला यांच्या याचिकेत प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने न्यायालयाने सरकारला ४ सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

Web Tital : Phone Tapping Case | government has no evidence against rashmi shukla lawyer told court

Gold Price Update | सोन्याच्या किंमतीत जबरदस्त घसरणीने ग्राहक खुश, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा नवीन भाव

Ganesh Utsav | लसीचे 2 डोस घेतलेल्यांना गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी

Ajit Pawar | ‘या’ मुद्यावरून अजित पवार भडकले; म्हणाले – ‘आपणच नियम करायचे आणि आपणच तोडायचे हे आमच्या रक्तात नाही’ 

Related Posts