IMPIMP

PI Appasaheb Shewale | पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

by nagesh
PI Appasaheb Shewale | Police Inspector Appasaheb Shewale announced President's Police Medal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  PI Appasaheb Shewale | खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे (Police Training Center, Khandala) उपप्राचार्य व पोलीस संशोधन केंद्रात (Police Research Centre) प्रतिनियुक्तीवर असलेले पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे (PI Appasaheb Shewale) यांना राष्ट्रपतीचे पोलीस पदक (President’s Police Medal) जाहीर करण्यात आले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी (Amrit Mahotsav) स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील १०८२ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मान करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील (Maharashtra Police) ४२ जणांचा समावेश आहे.

अप्पासाहेब बाबुराव शेवाळे (PI Appasaheb Shewale) यांनी १९८९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस खात्यात प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी पुणे शहरातील फरासखाना पोलीस ठाणे (Faraskhana Police Station), त्यानंतर विशेष सुरक्षा विभाग (Special Security Division), त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा व कणकवली पोलीस ठाण्यात (Kankavali Police Station) प्रमुख म्हणून काम पाहिले. त्याचवेळी तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरुद्धचा श्रीधर नाईक हत्येचा (Shridhar Naik Murder Case) खटला चालू होता. त्यावेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली. सहायक पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर (Anti Corruption Bureau Solapur) शहरातील जेल रोड पोलीस ठाणे व गुन्हे शाखेत काम पाहिले. त्यानंतर त्यांनी पदोन्नतीवर सोलापूर ग्रामीणमधील अक्कलकोट उत्तर व त्यानंतर अकलुज पोलीस ठाणे (Akluj Police Station) येथे व त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेत प्रभारी अधिकारी म्हणून काम केले.

शेवाळे (PI Appasaheb Shewale) यांनी आपल्या कार्यकाळात दरोडखोरांच्या आंतरराज्य टोळीला अटक करुन त्यांच्याकडून २१ लाखांची रोकड, तीन पिस्तुले आणि २५ पिस्तुले जप्त केली होती. या गुन्ह्यात सर्व गुन्हेगारांना १० वर्षे सक्तमजुरी व ५ लाख रुपये दंडाची शिक्षा झाली आहे.

अप्पासाहेब शेवाळे यांना मे २००७ मध्ये पोलीस महासंचालकाच्या सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात आले होते.
२०१७ ते २०१९ दरम्यान त्यांनी पुणे शहरात विश्रामबाग व कोथरुड पोलीस ठाण्याचे (Kothrud Police Station)
प्रभारी अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गॅस कटरचा वापर करुन बँकेच्या लॉकरमधून मौल्यवान वस्तून
लुटणाऱ्या ५ चोरट्यांच्या टोळीला त्यांनी अटक केली होती.
त्यांच्याकडून ११ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल केली.

Web Title :- PI Appasaheb Shewale | Police Inspector Appasaheb Shewale announced President’s Police Medal

हे देखील वाचा :

Laal Singh Chaddha | आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ ऑस्करच्या शर्यतीत ?

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !

Healthy Tips For Monsoon | पावसाळ्यात आवश्य फॉलो करा ‘या’ ९ टीप्‍स, आजारापासून राहाल दूर

Related Posts