IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 140 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by bali123
Pimpri Corona Update | Great relief One digit number of corona patients in Pimpri Chinchwad know other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही शहराला दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 130 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 130 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 72 हजार 580 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 140 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 67 हजार 820 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरामध्ये सध्या 1072 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची तर नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,419 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 32,198 जणांचे लसीकरण

रविवारी (दि.19) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 32 हजार 198 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 17 लाख 74 हजार 851 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Titel :- Pimpri Corona | 140 corona patients discharged in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा :

Related Posts