IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 140 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by bali123
Pimpri Corona | 149 Corona patients diagnosed in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट ओसरत आहे. शहरात आज नविन रुग्णांची (New patient) संख्या दीडशेच्या आत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 140 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 140 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Corona-infected patients) संख्या 2 लाख 72 हजार 331 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 78 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 67 हजार 463 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात 1182 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 1182 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
आज दिवसभरात शहरात पूर्वी मृत्यू झालेल्या 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4417 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 22,124 जणांना लस

शुक्रवारी (दि.17) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी कोविड -19 लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 22 हजार 124 जणांना लस देण्यात आली असून आजपर्यंत शहारमध्ये 17 लाख 20 हजार 386 जणांना लस देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.66 %

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 29 हजार 367 रुग्णांपैकी 11 लाख 2 हजार 950 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 7 हजार 700 आहे.
कोरोनाबाधित एकूण 18 हजार 717 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.66 टक्के आहे.

Web Title : Pimpri Corona | 140 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

Related Posts