IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 32 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | 12 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Pimpri Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 32 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार,
आज दिवसभरात शहरात 32 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजार 814 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 44 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 72 हजार 629 रुग्णांनी कोरोनावर मात (Pimpri Corona) केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात 415 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 415 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात याआधी मृत्यू झालेल्या शहरातील एका रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात शहरातील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दिवसभरात 8147 जणांचे लसीकरण

सोमवारी (दि.15) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 8147 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 24 लाख 16 हजार 901 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri Corona | 32 new patients of Corona in Pimpri Chinchwad, know other statistics

हे देखील वाचा :

Mutual Funds Sip | 15x15x15 चा फार्म्युला वापरून करोडपती बनने सोपे, वयाच्या 50 व्या वर्षी होऊ शकता 10 कोटीचे मालक; जाणून घ्या

Gold Price Today | लग्नसराईत कमी झाले सोन्याचे दर, चांदीही घसरली; जाणून घ्या आजचा नवीन दर

Pune | राज्यभरात प्रसिद्ध असलेली गुळुंचेची ‘काटेबारस’ यात्रा ‘हरहर महादेव’च्या जयघोषात साजरी

Related Posts