IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 64 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Corona in Maharashtra 1357 new corona cases in last 24 hours in maharashtra

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट ओसरत आहे. शहरातील नवीन रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. परंतु बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांच्या संखेत घट झाली आहे. त्यामुळे शहरात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. ही शहरासाठी काहींसी चिंतेची बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 75 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 75 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 74 हजार 306 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 64 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 69 हजार 675 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरामध्ये सध्या 913 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Pimpri Corona) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील 2 रुग्णांच्या मृत्यूची तर नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 11,451 जणांचे लसीकरण

मंगळवारी (दि.05) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 11 हजार 451 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 20 लाख 32 हजार 562 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title :- Pimpri Corona | 64 patients discharged from Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा :

Pune Airport | …म्हणून पुण्यातील लोहगाव विमानतळ ‘या’ तारखेपासून 15 दिवस बंद राहणार

Palghar ZP By-Election | पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा थेट शिवसेनेला पाठिंबा; राजकीय वर्तुळात खळबळ

Vengurla Municipal Council | महाविकास आघाडीला सिंधुदुर्गात धक्का ! काँग्रेसचा बंडखोर उमेदवार भाजपच्या मदतीने विजयी

Related Posts