IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 63 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Updates | Anxiety increased More than 2000 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट ओसरत आहे. शहरातील नवीन रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. मात्र बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे शहरात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. ही शहरासाठी काहींसी चिंतेची बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 63 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 63 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 75 हजार 232 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 51 रुग्ण कोरोनामुक्त (Pimpri Corona) झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 70 हजार 618 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

शहरामध्ये सध्या 856 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात हद्दीबाहेरील 1 रुग्णांच्या मृत्यूची तर नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.
गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,469 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 8,416 जणांचे लसीकरण

शुक्रवारी (दि.15) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 08 हजार 416 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 21 लाख 46 हजार 729 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri Corona | Diagnosis of 63 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad in last 24 hours, know other statistics

हे देखील वाचा :

Kisan Credit Card | SBI कडून बनवा किसान क्रेडिट कार्ड, घेऊ शकता 3 लाखापर्यंत कर्ज; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Covid Vaccination Certificate | लसीकरण प्रमाणपत्रावर कोणाच्या सांगण्यावरुन PM मोदींचा फोटो? जाणून घ्या RTI मधून मिळालेलं उत्तर

Mahadev Jankar | ‘गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही’

Related Posts