IMPIMP

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | In Pimpri Chinchwad, the number of corona patients has decreased there is no death today Learn other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona Update) लाट ओसरत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Update) 08 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC Medical Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दुपारी चार वाजेपर्यंत 2 हजार 673 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 08 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 940 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 26 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 879 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शहरामध्ये सध्या 169 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 40 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
तर 129 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी (दि.9) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 3 हजार 586 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 34 लाख 50 हजार 520 जणांना लस देण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pimpri Corona Update | A big drop in the number of corona patients in Pimpri Chinchwad, find out other statistics

हे देखील वाचा :

PMC Medical College | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टचे कामकाज ‘अध्यक्षा’ शिवाय सुरू राहाण्यात अडचणी निर्माण होणार नाहीत

7th Pay Commission | ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरीत 1000 ते 8000 रुपयांपर्यंत वाढ, होळीपूर्वी खुशखबर

Mayor Muralidhar Mohol | नळस्टॉप दुहेरी उड्डाणपूल रविवारपासून खुला, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Related Posts