IMPIMP

Pimpri Corona Update | मोठा दिलासा ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’ची एक अंकी रुग्णसंख्या, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Great relief One digit number of corona patients in Pimpri Chinchwad know other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona Update) लाट जवळपास ओसरली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Update) केवळ 02 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आज शहरात एकाही ओमायक्रॉनबाधित (Omicron) रुग्णाची नोंद झालेली नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC Medical Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज (सोमवार) दुपारी चार वाजेपर्यंत 2 हजार 545 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 02 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या 3 लाख 59 हजार 032 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 18 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 55 हजार 03 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शहरामध्ये सध्या 137 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 40 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 97 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी (दि.14) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 054 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहरामध्ये 34 लाख 62 हजार 431 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title :- Pimpri Corona Update | Great relief One digit number of corona patients in Pimpri Chinchwad know other statistics

हे देखील वाचा :

Dilip Walse Patil | ‘मी देखील थोडा कायदा शिकलोय’; असं का म्हणाले गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Weight Loss Drinks | रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या 5 वेगवेगळ्या प्रकारचे पाणी, काही दिवसांतच व्हाल ‘स्लिम अँड ट्रिम’

Pune Metro | ‘जाना था जापान पहुंच गए चीन’ ! पुणे मेट्रोच्या ‘या’ स्टेशनमुळे प्रवाशी त्रस्त, नाव बदलण्याची जोरदार मागणी

Related Posts