IMPIMP

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’ची रुग्णसंख्या घटली, आज एकही मृत्यू नाही; जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | In Pimpri Chinchwad, the number of corona patients has decreased there is no death today Learn other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कोरोनाची (Pimpri Corona Update) लाट ओसरत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Update) 10 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 8 रुग्ण बरे झाले आहेत. आज शहरात एकाही ओमायक्रॉनबाधित (Omacron) रुग्णाची नोंद झालेली नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC Medical Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दुपारी चार वाजेपर्यंत 2 हजार 638 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या 3 लाख 59 हजार 054 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 08 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 55 हजार 042 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शहरामध्ये सध्या 120 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 13 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 107 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बुधवारी (दि.16) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 2 हजार 409 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहरामध्ये 34 लाख 67 हजार 816 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title :- Pimpri Corona Update | In Pimpri Chinchwad, the number of corona patients has decreased there is no death today Learn other statistics

हे देखील वाचा :

Diabetes Management | उत्सवाच्या गोडव्याने वाढत नाहीना रक्तालील गोडवा? होळीपर्वात मधुमेही रुग्णांनी घ्यावी ‘ही’ काळजी

Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली पुणे महानगरपालिकेचे प्रशासक विक्रम कुमार यांची भेट

Benefits Of Raw Banana | कच्च्या केळ्यांच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते, चेहर्‍यावरील सुरकुत्याही दूर होतात; जाणून घ्या कशा

Related Posts