IMPIMP

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | 12 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona Update) लाट ओसरत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी
चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Update) 22 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज
प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC Medical Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दुपारी चार वाजेपर्यंत 3 हजार 537 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 22 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 824 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 66 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 658 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शहरामध्ये सध्या 274 ॲक्टिव्ह रुग्ण (Active Patient) आहेत. यामध्ये 28 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 246 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शुक्रवारी (दि.4) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 4 हजार 668 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहरामध्ये 34 लाख 35 हजार 046 जणांना लस देण्यात आली आहे

Web Title :- Pimpri Corona Update | Large decline in daily patient population in Pimpri Chinchwad know other statistics

हे देखील वाचा :

Aba Bagul | ‘पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंगमधील विद्यार्थी अमेरिकेत शैक्षणिक एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत जाणार’

Pune Crime | पुण्यात ‘भाई’ची थेट पोलिसालाच धमकी ! ‘मी रामनगरचा ‘भाई’, तलवारीने फडशा पाडीन

Pune Panshet Flood | ‘पानशेत पूरग्रस्त वसाहतींचे भूखंड मालकी हक्काने करण्यासाठी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पूरग्रस्त सोसायटीला सर्वतोपरी सहकार्य करेल’ – प्रशांत जगताप

Related Posts