IMPIMP

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवड शहरात आज शून्य रुग्णांच्या मृत्यूची नोंद; जाणून घ्या ‘कोरोना’ची इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Zero patient deaths recorded in Pimpri Chinchwad today; Find out more about Corona

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही त्यामुळे आज पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 32 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 41 रुग्ण बरे झाले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 1 हजार 694 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 32 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 932 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 41 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 853 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

शहरामध्ये सध्या 187 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 37 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 150 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी (दि.8) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 3,951 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 34 लाख 46 हजार 934 जणांना लस देण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pimpri Corona Update | Zero patient deaths recorded in Pimpri Chinchwad today; Find out more about Corona

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ED ‘ही’ भाजपची ATM मशीन झालीय, संजय राऊतांची टीका (व्हिडिओ)

Pune Corona Update | गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनातून बर्‍या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या जास्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Sadabhau Khot | ‘…तर आम्हीही अनिल परबांना बांबू लावायला कमी करणार नाही’; माजी मंत्र्याचा परिवहन मंत्र्यांना इशारा !

Related Posts