IMPIMP

Pimpri Corona Updates | चिंता वाढली ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3000 पेक्षा अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | In the last 24 hours 32 patients in Pimpri Chinchwad are corona free find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल शहरामध्ये 2365 रुग्ण आढळून आले होते. आज यामध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) 3159 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शहरात दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ होत असताना ओमिक्रॉनचे (Omicron variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 9 हजार 746 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 3159 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Updates) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 05 हजार 518 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1712 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 84 हजार 102 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

शहरात 17,615 सक्रिय रुग्ण
शहरामध्ये सध्या 17,615 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 583 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 17,032 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरामध्ये एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे दिलासा मिळाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,532 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title :- Pimpri Corona Updates | Anxiety increased! More than 3000 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा :

Pune Crime | बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना मोठा धक्का ! न्यायालयाने अखेर जामीन अर्ज फेटाळला

Maharashtra Rains | राज्यात गारपिटीचं सावट ! विकेंडला पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार

Related Posts