IMPIMP

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3500 पेक्षा अधिक नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | 12 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये दैनंदिन कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत
आहे. काल (मंगळवार) शहरामध्ये 3159 रुग्ण आढळून आले होते. आज (बुधवार) यामध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड
शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) 3505 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शहरात दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ होत असताना
ओमिक्रॉनचे (Omicron Covid variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 12 हजार 534 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 3505 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Updates) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 09 हजार 023 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2064 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 86 हजार 166 रुग्णांनी कोरोनावर मात (Recover patient) केली आहे.

शहरात 19,056 सक्रिय रुग्ण

शहरामध्ये सध्या 19,056 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 528 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 18,528 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,532 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title :- Pimpri Corona Updates | Big increase in number of patients in Pimpri Chinchwad! More than 3,500 new corona patients in the last 24 hours; Learn other statistics

हे देखील वाचा :

Chitra Wagh | ‘आबांची नाळ जनतेशी कायम जोडलेली असायची, रोहित तुझं खूप अभिनंदन’ – चित्रा वाघ

Pune Corporation | पुणे मनपाच्या आकाशचिन्ह विभागाने शहरातील 42000 बेकायदा फ्लेक्स, बॅनर हटविले

Uttarakhand Election 2022 | दिवंगत जनरल बिपीन रावत यांचे भाऊ निवृत्त कर्नल विजय रावत यांचा भाजपमध्ये प्रवेश

Related Posts