IMPIMP

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजारांवर, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1706 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Pimpri Chinchwad's journey towards Corona free city, find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना (Pimpri Corona Updates) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत
असताना ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omycron Variant) चिंता वाढवली आहे. रुग्ण वाढत असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे.
गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Updates) 1706 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 1706 नवीन रुग्ण (Pimpri Corona
Updates) आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 87 हजार 919 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये
387 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 76 हजार 110 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरामध्ये सध्या 8013 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
(Active Patient) आहेत. यामध्ये होम क्वारंटाईनमध्ये 7610 तर संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 403 रुग्ण आहेत. आज दिवसभरात शहरातील एकाही
रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,527 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर
लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 17 हजार 536 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारामध्ये 31 लाख 12 हजार 796 जणांना
लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri Corona Updates | Number of active patients in Pimpri Chinchwad over 8000, diagnoses of 1706 patients of ‘Corona’ in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा :

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3459 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | शास्त्री रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग, भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे खळबळ

Sharad Pawar | ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी 3 राज्यांच्या निवडणुका लढणार’ – शरद पवार

Related Posts