IMPIMP

Pimpri : IPLवर बेटींग घेणाऱ्यांकडून पोलिसाला मारहाण

by Team Deccan Express
Nashik Central Jail | nashik central jail 10 to 12 prisoners attacked on policeman

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – आयपीएल IPL सामन्यावर बेटींग घेणाऱ्या चार जणांकडून पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.16) रात्री पावणे दहाच्या सुमारास आकुर्डी येथील पंचतारा नगर ते गंगानगर दरम्यान घडली. याप्रकरणी चार जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. तर एकजण फरार झाला आहे.

काँग्रेसच्या नेत्यानं विचारला फडणवीस अन् दरेकरांना सवाल, म्हणाले – ‘पोलीस एखाद्याला चौकशीसाठी बोलावू शकत नाहीत का?’

श्रीपाद मोहन यादव (वय-22 रा. संदुर आनंदी निवास, पंचतारा नगर, आकुर्डी), अमित रामपाल अगरवाल (वय-35 रा. लोकमान्य हॉस्पिटल समोर, निगडी), नितीश रामदार काळे (वय-21 रा. विघ्नहर्ता गणेश मंदिराशेजारी, पंचारानंगर, आकुर्डी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर किशोर रेहाल ऊर्फ किशोर भाई (रा. चेंबुर, मुंबई) हा फरार झाला आहे. याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस नाईक विजय दत्तात्रय तेलेवार यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Nawab Malik : फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर संपूर्ण भाजप का घाबरली? फडणवीसांनी वकीलपत्र घेतलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरु असलेल्या आयपीएल IPL 20-20 सामन्यातील पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यावर बेटींग घेतली जात होती. आरोपी लोटस ऑनलाइन सट्टा खेळत व खेळवत असताना फिर्यादी आणि त्यांचे सहकारी कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना धक्काबुक्की करुन मारहाण केली. तसेच गोंधळ घालून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी कोरोना नियमांचे उल्लंघन करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Also Read :

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

Related Posts