IMPIMP

Platform Ticket | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! प्लॅटफॉर्म तिकीट आता पुन्हा 50 रुपयांवरुन 10 रुपयांवर

by nagesh
Platform Ticket | Good news for mumbai train passengers! Platform tickets now again at Rs 50 to Rs 10 mumbai marathi news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Platform Ticket | कोरोना काळात लोकांनी गर्दी करु नये, नातेवाईकांना सोडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर येऊ नये, यासाठी रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट (Platform Ticket) १० रुपयांवरुन ५० रुपये केले होते. ते आजपासून पुन्हा पूर्ववत १० रुपये करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

कोरोना काळात गेल्या दीड वर्षापासून रेल्वे प्रवासावर अनेक बंधने घालण्यात आली आहेत. आरक्षणतिकीटाशिवाय रेल्वे प्रवास करण्यास मनाई होती. तसेच कंन्फर्म तिकीट असल्याशिवाय रेल्वे स्थानकात कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये. प्रवाशांना आणण्यासाठी व सोडण्यासाठी त्यांचे नातेवाईक रेल्वे स्थानकावर आल्यास गर्दी होऊन कोरोना प्रसार वाढीस लागण्याची शक्यता होती. त्यामुळे रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरुन ५० रुपये केले होते. आता कोरानाची लाट ओसरली आहे. पॅसेंजर गाड्याही सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता प्लॅटफॉर्म तिकीटाचे (Platform Ticket) दर पुन्हा पूर्ववत करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने घेतला आहे. आजपासून पुन्हा प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपये करण्यात आले आहे. पुण्यासह इतरत्र लवकरच हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Web Title :- Platform Ticket | Good news for mumbai train passengers! Platform tickets now again at Rs 50 to Rs 10 mumbai marathi news

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Bio Fortified Corn | 250% जास्त प्रोटीन देईल मक्याची नवीन प्रजाती; मांस-अंडे-सप्लीमेंट्सवर राहावे लागणार नाही अवलंबून !

Coffee-Alzheimer Disease | जर तुम्हाला सुद्धा आहे वारंवार कॉफी पिण्याची सवय तर राहणार नाही ‘या’ मोठ्या आजाराचा धोका

Related Posts