IMPIMP

PM Crop Insurance Scheme | खूशखबर ! महाराष्ट्रातील जवळपास 9.5 लाख शेतकऱ्यांना पीएम पीकविमा योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये मिळणार

by nagesh
PM Crop Insurance Scheme | Near about 9 lakh 50 thousands farmers in the maharashtra will get crores of rupees under pm crop insurance scheme

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन – PM Crop Insurance Scheme | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान पीकविमा योजना (PM Crop Insurance Scheme) 2021 साली सहभागी झालेल्या साडेनऊ लाख शेतकऱ्यांना 422 कोटींचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सहभागी झालेल्या साडेनऊ लाख शेतकऱ्यांना 422 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे वाटप चालू करण्यात आले आहे.
मात्र 3 जिल्ह्यांमधील भरपाईला विमा कंपन्यांनी (Insurance Companies) आक्षेप घेतल्यामुळे या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तूर्त भरपाई मिळणार नसल्याचे कृषी विभागाकडून (Department of Agriculture) स्पष्ट करण्यात आलंय.
नुकसानीच्या प्रकारानुसार बहुतेक पात्र शेतकऱ्यांना भरपाईचे वाटप झालेले आहे.
पीककापणी प्रयोगाअंती आलेल्या भरपाई का रखडली निष्कर्षांच्या आधारे राज्यात किमान 800 कोटी रुपये वाटणे अपेक्षित आहे.
हा आकडा अंतरिम आहे. मात्र काही जिल्ह्यांत विमा कंपन्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
यामुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. (PM Crop Insurance Scheme)

कृषी विभागाने खरिपातील पीक कापणी प्रयोगाचे अंतिम निष्कर्ष विमा कंपन्यांना कळवताच कमी उत्पादन असलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे बंधन या कंपन्यांवर आहे.
कापणी प्रयोग झाल्यानंतर भरपाईचा आकडा जर 1000 रुपयांपेक्षा अधिक येत असल्यास संबंधित शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम द्यावी.
किंवा, या प्रयोगातून कमी उत्पादनानंतर भरपाईची रक्कम 1000 पेक्षा कमी येत असल्यास त्यामध्ये काही रक्कम टाकून एकूण कमीत कमी 1000 रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात याव्या याबाबत सूचना कंपन्याकडून याआधी देण्यात आल्यात.

दरम्यान, कृषी आयुक्तालयाच्या सांख्यिकी विभागातील (Department of Statistics)
कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मुख्यसांख्यिक विनयकुमार आवटे (Vinay Kumar Awate) यांच्या नेतृत्वाखाली यंदा शेतकरी,
शासन आणि विमा कंपन्या यांच्याशी उत्तम समन्वय ठेवला.
त्यामुळे राज्यात यंदा विक्रमी म्हणजे तब्बल 51 लाख 64 हजार शेतकऱ्यांना विमा भरपाईचा लाभ मिळतो आहे.
भरपाईपोटी मिळणारी ही रक्कम 3,054 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

Web Title :- PM Crop Insurance Scheme | Near about 9 lakh 50 thousands farmers in the maharashtra will get crores of rupees under pm crop insurance scheme

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Shivsena MP Sanjay Jadhav | ‘पूर्वी जुन्या मित्राने ‘ठोकली’ आता नवीन ठोकतोय ! पुण्यात शिवसैनिकांना पक्षाकडून पाठबळ मिळत नाही, म्हणून..’ – शिवसेना खासदार संजय जाधव

Indian Army Soldiers Vehicle Accident in Turtuk Sector (Ladakh) | लडाखमध्ये 26 सैनिक असलेले वाहन दरीत कोसळले: 7 जवानांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Chandrakant Patil On Uddhav Thackeray | चंद्रकांत पाटलांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र म्हणाले – ‘…तर पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरण्याचा अधिकार नाही’

Related Posts