IMPIMP

PM Kisan सन्मान निधी योजनेत मोठा बदल, आता विना Aadhaar करू शकता हे काम

by nagesh
PM Kisan Yojana | pm kisan yojana 12th installment will be deposite in account on this date

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापीएम किसान (PM Kisan) योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता तुम्ही तुमच्या आधार (Aadhaar) क्रमांकावरून लाभार्थी त्यांचे स्टेटस पाहू शकणार नाहीत. यासाठी पीएम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल जवळ ठेवावा लागेल. (PM Kisan)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ओटीपी शिवाय तुम्ही तुमचे स्टेटस पाहू शकणार नाही. या बदलासह, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 9 बदल झाले आहेत.

नोंदणी केल्यानंतर तुम्ही तुमचे स्टेटस स्वत: तपासू शकता. जसे की तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे, तुमच्या बँक खात्यात किती हप्ते आले आहेत इ. यापूर्वी, पीएम किसान पोर्टलला भेट देऊन, कोणताही शेतकरी त्याचा आधार क्रमांक, मोबाईल किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्टेटसची माहिती मिळवू शकत होता. (PM Kisan)

नंतर पीएम किसान पोर्टलवर मोबाईल नंबरवरून स्टेटस पाहण्याची सुविधा बंद झाली. केवळ आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांकावरून स्टेटस पाहता येऊ शकते. आता आधार आणि बँक खाते क्रमांक काढून मोबाईल क्रमांक आणि नोंदणी क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे.

पीएम किसान स्टेटस पाहण्याची नवीन पद्धत

स्टेप – 1 : सर्वप्रथम pmkisan.gov.in वर जा आणि डाव्या बाजूला असलेल्या छोट्या बॉक्समध्ये बेनिफिशिअरी स्टेटसवर क्लिक करा.
यानंतर उघडलेल्या पेजवर रजिस्ट्रेशन नंबर भरून तुमचे स्टेटस तपासा. जर तुम्हाला तो माहित नसेल तर स्टेप 2 फॉलो करा.

स्टेप – 2 : डाव्या बाजूला Know Your Registration Number ची लिंक मिळेल.
त्यावर क्लिक केल्यावर ओपन झालेल्या पेजवर पीएम किसान खात्यावर नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चा कोड भरा आणि Get Mobile OTP वर क्लिक करा.

दिलेल्या बॉक्समध्ये तुमच्या नंबरवर मिळालेला ओटीपी एंटर करा आणि Get Details वर क्लिक करा.
तुमचा नोंदणी क्रमांक आणि नाव तुमच्या समोर असेल.

स्टेप – 3 : पुन्हा पहिल्या स्टेपवर जा आणि नोंदणी क्रमांक टाका.
त्यानंतर कॅप्चा कोड टाकून स्टेटस तपासा.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या योजनेत 12.54 कोटी शेतकरी नोंदणीकृत आहेत.
केंद्र सरकार दरवर्षी 6000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये शेतकर्‍यांच्या खात्यात थेट हस्तांतरित करते.
मोदी सरकारने आतापर्यंत 11 हप्ते दिले आहेत.
एप्रिल-जुलै 2022 च्या हप्त्यानुसार आतापर्यंत 10,76,01,803 शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे.

Web Title :- PM Kisan | big change in pm kisan scheme now you can do this work even without aadhaar how to get registration number

हे देखील वाचा :

7th Pay Commission | दोन लाख नाही, आता कर्मचार्‍यांना इतकी रक्कम देऊ शकते सरकार, लवकरच होईल घोषणा

Pooja Chavan Case | संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला मारलं, 52 मिनिटांची सीडी समोर आणू; शिवसैनिकांनीच दिला इशारा

BJP On Thackeray Government | ‘आदित्य पक्षातील घाण गेली म्हणतात अन् मुख्यमंत्री आमदारांना आवाहन करतात, किती नाटकीपणा ?’; भाजपचा निशाणा

Related Posts