IMPIMP

PM Kisan योजनेंतर्गत स्टेटसबाबत नियमात झाला बदल, आता बंद केली ही सुविधा; जाणून घ्या कोणती

by nagesh
PM Kisan | changes in the rules regarding the status of pm kisan scheme now mobile number will not be needed

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan | पंतप्रधान किसान योजनेचा 10 वा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. मात्र, ही रक्कम
अद्यापही अनेक शेतकर्‍यांच्या खातयातवर पाठवण्यात आलेली नाही. ती या महिनाअखेरीस येण्याची शक्यता आहे. (PM Kisan)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुविधेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत अर्ज करणार्‍या 12.44 कोटी शेतकर्‍यांना फटका बसणार आहे. या बदलामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची काही गैरसोय होऊ शकते. मात्र, ते या सुविधेचा इतर मार्गांनी लाभ घेऊ शकतात. हा बदल काय आहे ते जाणून घेऊया.

काय बदलले आहे?
पीएम किसान (PM Kisan) योजनेंतर्गत लोकांना त्यांच्या हप्त्याची स्थिती तपासण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यासाठी तीन पर्याय देण्यात आले होते. शेतकरी त्यांचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते क्रमांकावरून त्यांच्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात.

मात्र आता मोबाईल क्रमांकावरून स्टेटस तपासण्याची सुविधा काढून टाकण्यात आली आहे. मात्र, पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर, शेतकरी आधार कार्ड क्रमांक आणि बँक खाते क्रमांकाद्वारे स्थिती तपासू शकतात.

का केला बदल
पीएम किसान योजनेमध्ये, मोबाईल नंबरवरून स्थिती तपासणे ही एक सोपी प्रक्रिया आहे, तरीही त्यासंदर्भात बदल करण्यात आले आहेत. याचे एक कारण हे देखील असू शकते की कोणीही तुमच्या मोबाईल नंबरवरून तुमच्या खात्याची स्थिती तपासू शकते आणि त्याचा गैरवापर देखील करू शकते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या शेतकर्‍यांना परत करावी लागणार रक्कम
पीएम किसान योजनेअंतर्गत जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यूपीमधील 7 लाख शेतकर्‍यांना
पीएम किसान योजनेअंतर्गत मिळालेल्या 10व्या हप्त्याचे पैसे परत करावे लागतील.
कारण हे शेतकरी एकतर आयकर रिटर्न भरतात किंवा त्यासाठी पात्र नाहीत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी या शेतकर्‍यांनी पैसे परत न केल्यास त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी 6000 रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवले जातात.
2000 रुपयांची ही रक्कम दर चार महिन्यांनी तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.
या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 हप्ते जारी करण्यात आले आहेत.

Web Title :- PM Kisan | changes in the rules regarding the status of pm kisan scheme now mobile number will not be needed

हे देखील वाचा :

Corporator Vasant More | नगरसेवक वसंत मोरे यांच्या एका Facebook पोस्टमुळं जखमी चेतनच्या मदतीसाठी एका रात्रीत जमा झाले 14 लाख (व्हिडिओ)

Skin Itching Problems | ‘या’ विशेष उपायांनी खाज सुटणे क्षणात होईल दूर; जाणून घ्या

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द

Related Posts