IMPIMP

PM Kisan eKYC | PM किसान लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती ! ‘हे’ काम लवकरच करा पूर्ण; अन्यथा होईल नुकसान, जाणून घ्या

by Team Deccan Express
PM Kisan eKYC | pm kisan yojana ekyc deadline extended complete online kyc process or else you wont get 11th installment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan eKYC | मोदी सरकार (Modi Government) शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) राबवत आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6000 रुपये जमा होत असतात. दरम्यान, या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारकडून ई-केवायसी करून घेण्याच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे. eKYC साठी आता 31 मे 2022 पर्यंत मुदत वाढवली आहे. याअगोदर मार्च 2022 अशी अंतिम तारीख होती.

दरम्यान, लवकरच पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महत्वाचे म्हणजे पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. जानेवारी 2022 मध्ये आतापर्यंत 10 हप्ते लाभार्थ्यांना प्राप्त झाले आहेत. 11 वा हप्ताही दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत सरकारकडून प्रत्येकी 2000 रुपयांचे 3 हप्ते लाभार्थ्यांना हस्तांतरित केले जातात. नवीन नियमांनुसार आता ई – केवायसी बंधनकारक असणार आहे. तसेच, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी 011-24300606 या क्रमांकावर फोन करूनही मदत घेऊ शकतात. दरम्यान, ई – केवायसी करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या. (PM Kisan eKYC)

काय आहे प्रक्रिया ?

सर्वप्रथम pmkisan.nic.in या वेबसाईटवर जा. तेथे Formers Corner च्या विभागात eKYC वर क्लिक करा.

यानंतर, OTP आधारित eKYC विभागात, आधार क्रमांक टाका आणि शोधा.

त्यानंतर, आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि Get OTP वर क्लिक करा.

यानंतर, OTP लिहा आणि सर्व तपशील भरल्यानंतर, eKYC प्रक्रिया करा.

Web Title :- PM Kisan eKYC | pm kisan yojana ekyc deadline extended complete online kyc process or else you wont get 11th installment

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts