IMPIMP

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! पीएम किसान योजनेच्या 10 व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळतील 3 आणखी फायदे; जाणून घ्या

by nagesh
PM Kisan Samman Nidhi Yojana | pm kisan samman nidhi social audit to start from may pm kisan nidhi 11th instalment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत (pantpradhan kisan samman yojana) पात्र शेतकर्‍यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात, जे तीन हप्ते दर चार महिन्यांनी जारी होतात. आतापर्यंत या योजनेत 9 हप्ते शेतकर्‍यांच्या (PM Kisan) खात्यात पाठवले गेले आहेत. आता शेतकर्‍यांना 10 वा हप्ता जारी केला जाईल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

काही रिपोर्टनुसार शेतकर्‍यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 10वा हप्ता 15 डिसेंबरपर्यंत जारी केला जाईल. तर रिपोर्टमध्ये हा सुद्धा दावा केला जात आहे की, सरकार किसान सम्मान निधी अंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करू शकते.

जर या योजनेत शेतकर्‍यांचे पैसे दुप्पट झाले तर शेतकर्‍यांना 4000 रुपये मिळतील. म्हणजे वार्षिक 12,000 रुपये जारी होतील. शेतकर्‍यांना 10 वा हप्त्याशिवाय यावेळी आणखी तीन लाभ सुद्धा मिळणार आहे. आता शेतकरी सुद्धा पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेऊ शकतात.

केंद्र सरकारने शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी या पेन्शन योजनेची सुरुवात केली आहे. यासोबत किसान क्रेडिट कार्ड या योजनेशी जोडले जातील, ज्यामुळे शेतकर्‍यांना मोठा फायदा होईल. याच्यात सहभागी झाल्याने कर्जाचा लाभ सुद्धा सहज घेता येईल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पीएम किसान क्रेडिट कार्ड (PM Kisan Credit Card)
PM Kisan स्कीमसोबत (PM Kisan) आता किसान क्रेडिट कार्ड योजना (KCC) सुद्धा जोडली जाईल.
कारण केसीसी बनवण्याचा प्रक्रियेचा वेग वाढवता येईल. म्हणजे ज्यांना सरकार 6000 रुपये देत आहे,
त्यांना केसीसी बनवणे सोपे होईल. सध्या 7 कोटी शेतकर्‍यांकडे केसीसी आहे.
सरकार लवकरात लवकर एक कोटी आणि लोकांना यामध्ये सहभागी करून त्यांना 4 टक्केवर 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे.

पीएम किसान मानधन योजना (PM Kisan samman yojana)
जर कुणी शेतकरी पीएम किसान सम्मान निधीचा (pm kisan samman nidhi yojana) लाभ घेत
असेल तर त्यास पीएम किसान मानधन योजनेसाठी वेगळे कागदपत्र द्यावे लागणार नाहीत.
कारण अशा शेतकर्‍यांची सर्व कागदपत्र भारत सरकारकडे असतील.
यामध्ये शेतकरी पीएम किसान स्कीममध्ये मिळालेल्या पैशातून थेट अंशदान करण्याचा पर्याय निवडू शकतात.
यामुळे खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत. 6000 रुपयांतून त्याचा प्रीमियम कापला जाईल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पीएम किसान आयडी कार्ड
मोदी सरकार पीएम किसान स्कीमच्या आकड्यांच्या आधारावर शेतकर्‍यांसाठी (Farmers)
युनिक फार्मर आयडी (Unique farmer ID) बनवण्याची तयारी करत आहे.
पीएम किसान आणि राज्याद्वारे बनवण्यात येत असलेल्या भूमी रेकॉर्ड डेटाबेससोबत जोडून हे ओळखपत्र बनवण्याचा प्लान आहे.
असे झाल्यानंतर शेतीसंबंधी योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचवणे सोपे होईल.

Web Title :- PM Kisan | good news for farmers three more benefits will be available with the 10th installment of rs 4000 in pm kisan yojana

हे देखील वाचा :

Della Leaders Club – DLC Pune | पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते जगातील पहिल्या बिझनेस प्लॅटफॉर्म डेला लीडर्स क्लब (DLC) पुणे चॅप्टरचे उद्घाटन

Anti Corruption Bureau Pune | शिरूर कार्यालयाच्या आवारातच 1 लाखाची लाच घेताना अधिकार्‍यासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Siddharth Chandekar | ‘तुला परवानगी देणारा मी कुणीच नाही’ ! ‘तिच्यासाठी’ची सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट प्रचंड व्हायरल

Related Posts