IMPIMP

PM Kisan बाबत मोठी बातमी, वाढवण्यात आली ‘या’ कामाची अंतिम तारीख

by Team Deccan Express
Modi Government | Modi government announces 100 to 500 hike in msp for kharif season

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan) ही मोदी सरकारची (Modi Government) एक विशेष योजना आहे. सर्व नोंदणीकृत शेतकर्‍यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे शेतकर्‍यांना किमान उत्पन्नाच्या आधारे मिळतात. 1 फेब्रुवारी 2019 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी ही योजना जाहीर केली होती.

या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. हे पैसे थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होतात. आता या योजनेशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.

केवायसीची तारीख वाढवली

केंद्र सरकारने अनिवार्य e-KYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत एका आठवड्याने वाढवून 31 मे 2022 केली आहे. पीएम किसान पोर्टलवरील सूचनेनुसार, सर्व पीएम किसान लाभार्थ्यांसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत 31 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

प्रक्रिया कशी पूर्ण करावी

शेतकर्‍यांना ई-केवायसी पूर्ण केल्यावरच हप्ता मिळेल, असे गेल्या वर्षी सांगण्यात आले होते. त्याशिवाय हप्ता येणार नाही. हाच नियम गेल्या वर्षी बदलला होता. सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांसाठी ई-केवायसी आधार अनिवार्य केले होते. मात्र तूर्तास त्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. (PM Kisan)

प्रक्रिया कशी पूर्ण करावी

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. उजव्या बाजूला तुम्हाला Farmers Corner पर्याय दिसेल. येथे eKYC लिंक मिळेल. लिंकवर क्लिक करा आणि तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा. त्यानंतर आधारशी लिंक केलेला तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी टाका. दिलेली सर्व माहिती बरोबर असल्यास ई-केवायसी पूर्ण केली जाईल अन्यथा नाही.

कधी मिळतील 11व्या हप्त्याचे पैसे

पीएम किसान 11 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. विविध मीडिया रिपोर्टनुसार, या महिन्याच्या अखेरीस रिलीज होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 जानेवारी 2022 रोजी 10 वा हप्ता जारी करण्यात आला होता.

ही आहे थेट लिंक

येथे थेट लिंक (https://pmkisan.gov.in/aadharekyc.aspx) देत आहोत. सरकारी पोर्टलनुसार, पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या सर्व शेतकर्‍यांसाठी ईकेवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. आधार आधारित ओटीपी पडताळणीसाठी किसान कॉर्नरमधील ईकेवायसी पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या सीडीसी केंद्रांशी संपर्क साधा.

हे काम तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून घरी बसूनही करू शकता.
2021-22 या आर्थिक वर्षातच शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी सरकारने या योजनेअंतर्गत 43,000 कोटी रुपये खर्च केले आहेत.
जे शेतकरी पीएम किसानच्या अखत्यारीत येतात, त्यांना सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये मिळतात.
हे पैसे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात.

जे शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र आहेत,
ते किसान कॉर्नरच्या मदतीने सरकारच्या अधिकृत पीएम किसान पोर्टलवर लाभार्थी स्थिती तपासू शकतात.
यासाठी सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.

Web Title :- PM Kisan | pm kisan last date of this work extended

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts