IMPIMP

PM Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांना 10 व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळतील 3 आणखी फायदे, जाणून घ्या कसे

by nagesh
PM Kisan Yojana Update | pm kisan samman nidhi yojana 11th installment updates 8 change scheme whether you will have to return money

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  PM Kisan | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) च्या अंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरच पुढील हप्त्याचे पैसे येणार आहेत. जर शेतकरी (PM Kisan) दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील तर 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात येतील.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मीडिया रिपोर्टनुसार, मोदी सरकार (Modi Government) शेतकर्‍यांना मिळणारी ही सुविधा दुप्पट करण्याचा विचार करत आहे.
जर असे झाले तर शेतकर्‍यांना 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये मिळू शकतात.
लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात 10 वा हप्ता सुद्धा ट्रान्सफर केला जाईल.
परंतु, याचे आणखी तीन फायदे सुद्धा मिळू शकतात, ते कोणते जाणून घेवूयात…

(1) किसान क्रेडिट कार्ड (KCC kisan credit card)

पीएम किसान स्कीमसोबत आता किसान क्रेडिट कार्ड योजना सुद्धा जोडली जाईल.
कारण केसीसी बनवण्याचा प्रक्रियेचा वेग वाढवता येईल.
म्हणजे ज्यांना सरकार 6000 रुपये देत आहे, त्यांना केसीसी बनवणे सोपे होईल.

सध्या 7 कोटी शेतकर्‍यांकडे केसीसी आहे. सरकार लवकरात लवकर एक कोटी आणि लोकांना यामध्ये सहभागी करून त्यांना 4 टक्केवर 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

(2) पीएम किसान मानधन योजना

जर कुणी शेतकरी पीएम किसान (PM Kisan) सम्मान निधीचा लाभ घेत असेल तर त्यास पीएम किसान मानधन योजनेसाठी वेगळे कागदपत्र द्यावे लागणार नाहीत.
कारण अशा शेतकर्‍यांची सर्व कागदपत्र भारत सरकारकडे असतील.

यामध्ये शेतकरी पीएम किसान स्कीममध्ये मिळालेल्या पैशातून थेट अंशदान करण्याचा पर्याय निवडू शकतात.
यामुळे खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत. 6000 रुपयांतून त्याचा प्रीमियम कापला जाईल.

(3) किसान कार्ड (KCC) बनवण्याची आहे योजना

मोदी सरकार पीएम किसान (PM Kisan) स्कीमच्या आकड्यांच्या आधारावर शेतकर्‍यांसाठी (Farmers) युनिक फार्मर आयडी (Unique farmer ID) बनवण्याची तयारी करत आहे.
पीएम किसान आणि राज्याद्वारे बनवण्यात येत असलेल्या भूमी रेकॉर्ड डेटाबेससोबत जोडून हे ओळखपत्र बनवण्याचा प्लान आहे.
असे झाल्यानंतर शेतीसंबंधी योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचवणे सोपे होईल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :  PM Kisan | pm kisan scheme can get rs 4000 in 10th installment and 3 more benefits

हे देखील वाचा :

Satara Police | दुर्देवी ! दीडच वर्षापुर्वी विवाह झालेल्या 29 वर्षीय पोलिसाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Sourav Ganguly | सौरव गांगुलीला ICC मध्ये मिळणार मोठी जबाबदारी ! जाणून घ्या दादाच्या नव्या ‘इनिंग’बाबत

Modi Government | दररोज 7 रूपयांची बचत करून दरमहा मिळवा 5000 रूपये, जाणून घ्या मोदी सरकारची ‘ही’ जबरदस्त स्कीम

Related Posts