IMPIMP

PM kisan | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता तुम्हाला दरवर्षी 6000 बरोबर 36000 रुपये मिळतील, तात्काळ करा ‘हे’ काम

by nagesh
pm kisan samman nidhi yojana pm modi to release 11th installment today how to check your name online

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM kisan | पीएम किसान सन्मान निधीच्या (PM Kisan) लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहिना 3 हजार रुपये मिळू शकतात आणि त्यासाठी त्यांना कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज नाही. पीएम किसान योजनेंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 2000 चे तीन हप्ते म्हणजेच वार्षिक 6000 रुपये मिळतात. पण आता या योजनेत (PM kisan Mandhan Yojna) तुम्हाला वार्षिक 36000 रुपये मिळू शकतात. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आता तुम्हाला 36000 रुपये मिळू शकतात.

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत (PM kisan) शेतकऱ्यांना दर महिना पेन्शन दिली जाते. या योजनेंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहिना 3 हजार रुपये म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये पेन्शन स्वरूपात दिले जातात. वास्तविक मोदी सरकार ही रक्कम शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी देते. चला तर जाणून घेऊयात तुम्ही कसे या योजनेत थोडे पैसे गुंतवून गारंटीड पेन्शन मिळवू शकता.

आवश्यक कागदपत्रे.

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. जसे आधार कार्ड, बँक खाते तपशील इ. पण जर तुम्ही पीएम किसानचा लाभ घेत असाल तर तुम्हाला यासाठी कोणतेही अतिरिक्त कागदपत्र सादर करण्याची गरज नाही. 18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. यामध्ये वयानुसार गुंतवणुकीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

  • या योजनेचा लाभ 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी घेऊ शकतो.
  • यासाठी लागवडीयोग्य जमीन जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत असावी.
  • यामध्ये किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे वयाच्या शेतकऱ्यांना 55 ते 200 रुपये महिन्याला, शेतकऱ्यांच्या वयानुसार गुंतवावे लागतील.
  • वयाच्या 18 व्या वर्षी सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांना 55 रुपये गुंतवणूक करावी लागेल.
  • जर शेतकऱ्याचे वय 30 वर्षे असेल तर त्याला 110 रुपये जमा करावे लागतील.
  • जर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी सहभागी झालात तर तुम्हाला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील.

Web Title : PM Kisan | pm kisan update under man dhan yojna farmers will get rs 36000 every year know here how

हे देखील वाचा :

Pimpri Corona | चिंतेत वाढ ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 1000 हून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Benefits Of Tulsi | ओमिक्रॉनपासून वाचण्यासाठी हिवाळ्यात तुळशीचे सेवन होऊ शकते परिणामकारक, जाणून घ्या 5 जबरदस्त फायदे

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलियोमधून हटवला ‘हा’ स्टॉक, 1 वर्षात दिला शानदार रिटर्न, जाणून घ्या कारण

Related Posts