IMPIMP

PM Kisan Sanman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 1 जानेवारीलाच मोदी सरकारकडून भेट; 4 हजार रुपये थेट खात्यात पाठवणार, जाणून घ्या

by nagesh
PM Kisan Samman Nidhi Yojana | pm kisan samman nidhi social audit to start from may pm kisan nidhi 11th instalment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan Sanman Nidhi Yojana | मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana) आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून आता 1 जानेवारीलाच शेतकऱ्यांना (Farmers) गिफ्ट देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची माहिती आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची भेट असणार आहे. 1 जानेवारी 2022 रोजी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जाणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Sanman Nidhi Yojana) हप्ता जारी करणार आहेत. तसेच, या दिवशी पंतप्रधान मोदी शेतकरी उत्पादक संघटनांना इक्विटी अनुदान देखील जारी करणार आहेत. तुम्ही या कार्यक्रमाशी दूरदर्शन किंवा pmindiawebcast.nic.in द्वारे कनेक्ट होऊ शकता. असा एक मेसेज शेतकऱ्यांना पाठवण्यात आला आहे.

ज्यावेळी शेतकऱ्यांनी (Farmers) e-KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल. तेव्हाच पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (PM Shetkari Sanman Nidhi Yojana ) लाभार्थ्यांना 10 व्या हप्त्याचे लाभ मिळणार आहेत. तसेच, या योजनेत ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये –

ज्या शेतकऱ्यांना अद्याप 9 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात 2 हप्त्यांचे पैसे एकत्र येतील म्हणजेच त्यांच्या खात्यात 4 हजार रुपये ट्रान्सफर होतील. पण ही सुविधा केवळ त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी 31 ऑक्टोबरपूर्वी नोंदणी केलीय.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

ई-केवायसी प्रक्रिया?

– सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.

– उजव्या बाजूला अनेक प्रकारचे टॅब दिसतील.

– सर्वात वर तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल.

– त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर मागितलेले तपशील भरुन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा

पात्र शेतकरी कसे करतील नोंदणी –

– शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

– त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या ‘फार्मर कॉर्नर’ (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा.

– याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी करू शकता.

– याठिकाणी ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका.

– कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा, त्यानंतरच प्रोसेस पुढे जाईल.

– तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील, शेतीविषयक तपशील विचारला जाईल.

– ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

Web Title :- PM Kisan Sanman Nidhi Yojana | modi govt to transfer 10th installment in beneficiaries account on this date PM Kisan Sanman Nidhi Yojana check here

हे देखील वाचा :

कामाची बातमी ! जाणून घ्या Aadhaar-Voter ID लिंक करण्याच्या 3 सर्वात सोप्या पद्धती, SMS ने सुद्धा होईल काम

Pune Crime | 50 लाखाचे खंडणी प्रकरण ! पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुधीर रामचंद्र आल्हाटला अटक; माहिती अधिकार कार्यकर्त्यासह सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे यांच्याविरुद्ध FIR

Pune Corporation | पुणे महापालिकेला ‘घबाड’ सापडलं ! मनपाला मिळणार 10 हजार 60 कोटी रुपयांचा महसुल; तब्बल 7,440 Km च्या बेकायदा केबल्स आढळल्या, रिलायन्सच्या ‘जिओ डिजिटल फायबर प्रा.लि.’ चे प्रमाण सर्वाधीक

Related Posts