IMPIMP

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! मोदी सरकार ‘या’ दिवशी PM किसानचा 11 वा हप्ता जाहीर करणार; जाणून घ्या

by Team Deccan Express
PM Kisan Yojana | pm kisan yojana 12th installment will be deposite in account on this date

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Yojana | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबवत आहे. 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. दरम्यान, सध्या शेतकरी अकराव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहे. नुकतेच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Minister Narendra Singh Tomar) यांनी लवकरच 11 वा हप्ता जारी करणार असल्याचं सुतोवाच केलं होतं. दरम्यान आता पीएम किसान योजनेतील 11 वा हप्ता 31 मे रोजी जारी केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला आहे.

जे 31 तारखेपूर्वी ई – केवायसी (e-KYC) करणार नाहीत त्यांच्या खात्यात पैसे मिळणार नाहीत. असंही सांगितलं जात आहे. अकरावा हप्ता जमा झाला आहे की नाही ? याबाबत अधिकृत माहिती हवी असल्याचं लाभार्थी काही प्रक्रियाच्या माध्यमातून ऑनलाइन पाहू शकतात. (PM Kisan Yojana)

कशी तपासावी यादी ?

– तुम्हाला प्रथम अधिकृत PM किसान पोर्टलला (www.pmkisan.gov.in) भेट द्यावी लागेल.

– इथल्या ‘फार्मर्स कॉर्नर’ वर जा.

– या कोलनखालील ‘लाभार्थी यादी’ बटणावर क्लिक करा.

– त्यानंतर गावाची स्थिती, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि इतर तपशील प्रविष्ट करा.

– शेवटी ‘Get Report’ बटणावर क्लिक करा.

दरम्यान, या प्रक्रियेनंतर, पीएम किसान (PM Kisan) लाभार्थीचा संपूर्ण व्यवहार तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल. येथे तुम्हाला शेवटच्या हप्त्याचे तपशील, लाभार्थीच्या खात्यात हस्तांतरित केलेल्या रकमेची तारीख आणि इतर माहिती मिळणार आहे. जर तुमचे नाव आधीच्या यादीत असेल आणि तुमचे नवीन यादीत नसेल, तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 वर कॉल करू शकता.

Web Title :- PM Kisan Yojana | pm kisan samman nidhi yojana how to check beneficiary list 2022 status online before 11th installment

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts