IMPIMP

PM Modi Visit To Pune | PM मोदींवरील टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर, माजी मंत्री म्हणाले – ‘मग शरद पवार स्वतः पुणे मेट्रोतून फिरून का आले’

by nagesh
PM Modi Visit To Pune | bjp leader girish mahajan gives befitting reply to ncp chief sharad pawar

सरकारसत्ता ऑनलाइन – PM Modi Visit To Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांचा उद्या म्हणजेच रविवारी पुणे दौरा आहे. पुण्यातील या दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींसह भाजपलाही टोला लगावला होता. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांना भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (PM Modi Visit To Pune)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा आढावा घेण्यासाठी महाजन नाशिकमध्ये (Nashik) आले होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवांरांच्या वक्तव्यावर आणि युक्रेनमधील विद्यार्थ्यांना भारतात आणल्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

शरद पवार यांच्या आरोपांना काही अर्थ नाही कारण जी कामे पुर्ण झाली आहेत त्याचीच उद्घाटने (Inauguration) होतात.
शरद पवारांचा मेट्रोशी (Pune Metro) काडीमात्र संबंध नाही मग ते मेट्रोमध्ये का फिरून आले ?, मी किती चांगलं काम करत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.
त्यासोबतच पंतप्रधान पुण्यात येत आहेत त्यामुळे पुणे भाजपमय, (BJP) मोदीमय झालं असून याचं त्यांना वाईट वाटत आहे.
त्यातूनच शरद पवार असले आरोप (Allegations) करत आहेत, असं म्हणत गिरीश महाजन यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. (PM Modi Visit To Pune)

दरम्यान, युक्रेनमधील (Ukraine) विद्यार्थ्यांकडे केंद्राने दुर्लक्ष केलेलं नाही. भारतात (India) रोज दोन – तीन फ्लाईट (Flight) येत आहेत, असं म्हणत महाजन यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
महाजन यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीकडून (NCP) काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title :- PM Modi Visit To Pune | bjp leader girish mahajan gives befitting reply to ncp chief sharad pawar

हे देखील वाचा :

Joint Pain हृदय आणि फुफ्फुसासाठी धोकादायक, ‘या’ संकेताकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

Virat Kohli | याला म्हणतात जिगर ! विराट-रोहितमध्ये ‘क्रॉस’ आहे म्हणणाऱ्यांनी हा Video नक्की पाहा

Related Posts