IMPIMP

PM Narendra Modi | लोकांच्या पोटावर पाय न आणता स्थानिक स्तरावर ‘कन्टेन्मेंट’ करा; पंतप्रधानांच्या राज्यांना सूचना

by nagesh
PM Narendra Modi | do not step on peoples earning prime minister narendra modis appeal states

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Narendra Modi | कोरोनाचा (Coronavirus) वाढता संसर्ग थांबवण्यासाठी उपाययोजना करताना लोकांच्या पोटावर पाय येणार नाही याची दक्षता घ्यावी. जिथे रुग्ण संख्या जास्त आहे तिथे स्थानिक स्तरावर कन्टेन्मेंट करण्यात यावा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्यांना दिल्या आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्यावतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्यांच्या हालचालीवर मर्यादा आल्या आहेत. डॉक्टरांनी त्यांना सलग दोन अडीच तास न बसण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती (Debashish Chakraborty) यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून मुख्यमंत्री उपस्थित न राहण्याचे कारण आणि राज्याच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) बैठकीला उपस्थित राहतील, असे कळविले होते.
पंतप्रधान कार्यालयाने त्याला मान्यता दिल्यानंतर टोपे यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) या बैठकीत सहभागी झाले होते.
बैठकीत राज्यातील कोरोनाची स्थिती, लसीकरण मोहीम, उपाययोजना तसेच निर्बंधांबाबत माहिती देण्यात आली असल्याचे टोपे यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, डेल्टा (Delta) नंतर आलेल्या ओमायक्रॉन विषाणूबद्दल (Omicron Variant) असलेल्या शंकांचे हळूहळू निरसन होत आहे.
या नव्या विषाणूचा संसर्गाचा वेग कितीतरी पटीने जास्त आहे.
मात्र जनतेने घाबरून जाऊ नये, अशा परिस्थितीत नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे.
कोरोना नियमांचे त्यांनी पालन केले पाहिजे. असेही त्यांनी सांगितले.

Web Title :  PM Narendra Modi | do not step on peoples earning prime minister narendra modis appeal states

हे देखील वाचा :

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी या शेअरमधून 10 कोटी कमावले, 15 दिवसांत झाले वारे-न्यारे

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! DA मध्ये वाढीबाबत चित्र स्पष्ट, जाणून घ्या किती वाढणार पगार

Pune Crime | पुण्यातील बड्या बांधकाम व्यवसायिकाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून धमकी, 20 लाखाची मागितली खंडणी; 6 जण अटकेत, जाणून घ्या प्रकरण

Related Posts