IMPIMP

PM Narendra Modi | लॉकडाऊनची शक्यता नाकारली ! ‘पॅनिक होऊ नका, पण काळजी घ्या’ – PM मोदींचं आवाहन

by nagesh
PM Narendra Modi | conspiracy to assassinate pm narendra modi by underworld don dawood henchmen unknown audio message on mumbai traffic police mobile

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – PM Narendra Modi | कोरोनाच्या दोन्ही लाटेनंतर आता तिस-या लाटेनं (Coronavirus) देशात कहर केला आहे. राज्यासह देशात कोरोनाच्या दैनंदिन बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉनचा (Omicron Variant) आकडा देखील वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांंनी आज (गुरूवारी) मुख्यमंत्र्यांशी (Chief Minister) संवाद साधला. यावेळी मोदी यांनी ओमायक्रॉनच्या संसर्गाबद्दल काळजी घेण्याचे आवाहन केलं. ‘पॅनिक होऊ नका, पण पूर्णपणे खबरदारी घ्या,’ असं म्हणत पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनची शक्यता स्पष्ट शब्दात नाकारली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत मोदींनी संवाद साधला. यानंतर त्यांनी जनतेशी देखील संवाद साधला आहे. मोदींनी सर्व भारतीयांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधताना मोदी म्हणाले, ”भारताची लढाई गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे, परिश्रम एकमात्र आपले ध्येय आहे. आपण 130 भारतीय लढा देत आहोत. ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती घेतली आहे. अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली आहे. अनेक मुख्यमंत्र्यांसोबत महत्वपूर्ण चर्चा झाली आहे. ओमायक्रॉनचा संशय होता तो आता दूर झाला आहे. ओमायक्रॉनमुळे जास्त प्रमाणात संसर्ग होत आहे. अमेरिकेत 14 लाख केसेस सापडल्या आहे. भारतात आपण लक्ष ठेवून आहोत. पॅनिक परिस्थिती निर्माण होईल याची खबरदारी घ्यावी लागेस. सण उत्सवात लक्ष ठेवावे लागणार आहे. लोकांनी याकडे दुर्लक्ष करू नये,” याबाबत त्यांनी आवाहन केलं आहे.

दरम्यान, ”भारतातील लशी जगभरात दिल्या जात आहे.
90 टक्के लोकांना पहिला डोस पूर्ण झाला आहे. दुसऱा डोस 70 टक्के पूर्ण झाला आहे.
लसीकरण अभियानाला अजून 3 दिवसबाकी आहे. भारत आता तीन कोटी किशोरवयीन मुलांचे लसीकरण पूर्ण करत आहे, असं पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटलं आहे.
आज राज्यांकडे लशीचा साठा उपलब्ध आहे.
आरोग्य सेवकांना जितक्या लवकरच बुस्टर डोस (Booster Dose) लागेल ते चांगलंय.
लस घेतल्यानंतरही कोरोना होतोय, मास्क घातला तरी कोरोना होतो अशा अफवा पसरल्या आहे.
याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. आपल्याला कोरोना विरोधात लढाईचा 2 वर्षांचा अनुभव आहे.
आर्थिक परिस्थितीचे नुकसान होईल असं होऊ द्यायचं नाही. लोकल जिथून जास्त केसेस येत आहे, तिथे आपल्याला लक्ष द्यायचे आहे. होमआयसोलेशनमध्ये जास्त उपचार झाले पाहिजे,” असं देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  PM Narendra Modi | dont panic but be careful pm narendra modi denies possibility of lockdown in country

हे देखील वाचा :

Pune Coep Jumbo Covid Centre | सीओईपी जम्बो कोरोना स्पेशालिटी हॉस्पीटल सुरू करण्याच्या तयारीत पण…महापालिकेने जुनीच बिले न दिल्याने संस्थां काम करणार का याबाबत साशंकता

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे दुसऱ्यांदा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, मनपा आयुक्त विक्रम कुमारांसोबत केला होता पाहणी दौरा

Pune Corona Updates | पुणेकरांची चिंता वाढली ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5500 पेक्षा अधिक नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts